जिल्हा वार्षिक योजनेतून विकासासाठी भरघोस निधी ; उपमुख्यमंत्री अजित पवार
marathinews24.com
पुणे – जिल्हा राज्याचे ग्रोथ इंजिन असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन विभागाने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), सन 2025-26 अतंर्गत पुणे जिल्ह्याकरिता 1 हजार 379 कोटी रुपये इतका नियतव्यय मंजूर केला आहे. नियोजन विभागाने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जवळपास 288 कोटींची वाढ त्यात करण्यात आली आहे. अनुसुचित जाती उपयोजना आणि आराखडा 145 कोटी रुपयांचा आहे, तर आदिवासी उपयोजनेच्या नियतव्ययामध्ये वाढ करुन 65.46 कोटींचा आराखडा मंजुर केला आहे.
तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर – उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी
सर्व क्षेत्रात महाराष्ट्राची घोडदौड कायम राखताना ‘सुसंस्कृत राज्य’ ही महाराष्ट्राची ओळख आणखी ठळक करण्याकरीता सर्वांनी मिळून प्रयत्न करावे, असे आवाहन पवार यांनी केले.
यावेळी पोलीस महासंचालक सन्मान चिन्हप्राप्त पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सन्माचिन्ह, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सेवा बजावलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विशेष पदक तसेच कामगार विभागातील कर्मचाऱ्यांना विशिष्ठ सेवेसाठी प्रोत्साहनात्मक प्रशस्तीपत्र आणि महसूल विभागातील जिल्हा आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आले. पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दलाच्या संयुक्त परेड संचलनाचे निरीक्षण केले. यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेवून पवार यांनी शुभेच्छा दिल्या.