Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

रिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटक

रिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटक

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – रिक्षा चालकाला अडवून बेदम मारहाण करीत मोबाइलसह रोकड चोरी करणार्‍या टोळीला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील ऐवज जप्त करण्यात आला आहे. किरण एडबा झोंबाडे वय २० रा. लक्ष्मीनगर, पर्वती) पंकज सुभाष पवार वय २१ रा. शाहू वसाहत पर्वती) कुमार बाळकृष्ण खुडे वय ३० रा. अपर बिबवेवाडी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी रिक्षा चालकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना १२ जूनला मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास घडली होती.

आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस – सविस्तर बातमी 

रिक्षा चालक हे १२ जूनला पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबवेवाडीतील गुरूगौतम मुनी हॉस्पिटल समोरून जात होते. त्यावेळी दोन दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी रिक्षा चालकाला अडवून मारहाण करीत मोबाइल, रोकड चोरून नेली. याप्रकरणी पथकाने सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक विश्लेषणाला गती दिली. पोलीस अमलदार सुमीत ताकपेरे आणि रक्षित काळे यांना आरोपींची माहिती मिळाली. पथकाने गंगाधाम रोड परिसरातून टोळीला ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते, एसीपी राहूल आवारे, वरिष्ठ निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे, उपनिरीक्षक मालोजी कांबळे, संजय गायकवाड, विनोद जाधव, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, राहूल खाडे, ज्योतिष काळे, संतोष बनसुडे, महेश गिरी, दत्ता शेंद्रे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×