Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

नशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभ

नशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभ

येरवडा येथील सामाजिक न्याय भवनात जनजागृती अभियानाचा शुभारंभ

marathinews24.com

पुणे – समाज कल्याण प्रादेशिक उपआयुक्त, वंदना कोचुरे यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, येरवडा येथे ‘नशा मुक्त भारत अभियान, विकसित भारत की पहचान’ या जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण – सविस्तर बातमी 

प्रादेशिक उपआयुक्त आणि सहायक आयुक्त कार्यालय समाज कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमास समाज कल्याण आयुक्तालयाच्या व्यसनमुक्ती विभागाच्या सहायक आयुक्त मीना आंबाडेकर, समाज कल्याण अधिकारी ज्ञानेश्वर जावळे, माधुरी वाघमोडे, जिल्हा परिषद समाज कल्याण निरीक्षक सागर सोनवणे, बाल कल्याण संस्थेच्या व्यवस्थापिका अपर्णा पानसे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी भांगरे उपस्थित होते.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत देशातील अमली पदार्थांच्या मागणी कमी करण्यासोबत अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्याकरिता ‘मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने १५ ऑगस्ट २०२० रोजी ‘नशा मुक्त भारत अभियान’ सुरू करण्यात आले असून आता हे अभियान देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आले आहे. दरवर्षी २६ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिन’ निमित्त १७ जून ते २६ जून २०२६ या कालावधीत विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून युवकांना व्यसनापासून दूर ठेवून निरोगी व सशक्त समाज घडविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला, अशी माहिती सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

या कार्यक्रमांतर्गत नशामुक्ती पोस्टर स्पर्धेचे कोरेगाव पार्क येथील दि पूना स्कूल ॲण्ड होम फॉर ब्लाइंड बॉईज येथे आयोजित करण्यात आली. स्पर्धेत जिल्ह्यातील दहा दिव्यांग शाळातील सुमारे 90 विद्यार्थ्यांनी भाग घेतले. प्रख्यात चित्रकार नीरज सबनीस यांनी पोस्टर स्पर्धेचे परीक्षण करुन गुणांकन केले.

स्पर्धेचा निकाल :
प्रथम क्रमांक : हुसेन सय्यद, आधार मूकबधिर विद्यालय बिबेवाडी, द्वितीय क्रमांक: महाबुबी शाबादी, चिंचवड बधीर मुक विद्यालय निगडी आणि तृतीय क्रमांक: शुभम अंबाजी जाधव, बधिर मूक शिक्षण केंद्र पुणे आणि समृद्धी वैजनाथ मिसाळ, चिंचवड बधीर मूक विद्यालय निगडी पुणे यांना विभागून देण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×