Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

बीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाड

बीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाड

६ लाख ६८ हजारांचा भेसळ युक्त साठा जप्त

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाच्या भेसळविरोधी मोहिमेला गती दिली असून विविध खाद्यपदार्थांसह दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी प्रशासनाकडून धडक कारवाई सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने केजमधील उमरी रोडवरील विशाल डेअरीच्या मिठाई उत्पादन केंद्रावर धाड टाकली. तेथून ६ लाख ६८ हजारांचा भेसळ युक्त साठा जप्त केला. कारवाईमुळे परिसरातील पान टपऱ्या धारकांमध्ये आणि भेसळखोरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटक – सविस्तर बातमी 

अन्न औषध प्रशासनाकडून धडक कारवाई करत अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक परिस्थितीत तयार करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचा सुमारे ६ लाख ६८ हजार ४०९ रुपयांचा साठा जप्त केला आहे. तसेच संबंधित उत्पादन केंद्राचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार १७ जून रोजी ही तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधित उत्पादन केंद्रात अत्यंत अस्वच्छ वातावरणात हलवा, कलाकंद, इतर खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याचे आढळून आले. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई केली. खाद्यपदार्थांचे नमुने घेण्यात आले. हे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×