Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्री

केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्री

सियाच्या मोबाइलमध्ये मिळाले कटाचे धागेदोरे

marathinews24.com

पुणे – प्रियकराच्या मदतीने तरूणीने होणार्‍या नवर्‍याला लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी नेउन त्याला ढकलून देत खून केला. याप्रकरणात पोलीस तपासात आणखी एक चक्रावून टाकणारा खुलासा उघडकीस आला आहे. आरोपी तरूणीने खून कसा करायचा, ट्रेकवर गेल्यानंतर खुन हा नैसर्गिक वाटावा यासाठी काय करावे, असे गुगलवर सर्च केल्याची हिस्ट्री आहे. त्यामुळे तिने होणार्‍या नवर्‍याचा काटा काढण्यासाठी सोशल मीडियाचाही आधार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

विलास घुले हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे आंदोलनकर्त्यांशी साधला संवाद – सविस्तर बातमी 

केतन विशाल अगरवाल (वय २५ रा. लोढा बेलमोंडो टॉवर गहुंजे, ता. मावळ) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. सिया प्रविण गोयल (वय २० रा. लिलाकुंज, ७८ / २१ न्यु एरा सोसायटी गंगाधाम समोर कोंढवा रोड, बिबवेवाडी) चेतन बाबुलाल चौधरी (वय २२, रा. पार्श्वनगर, बी ४/३०१ कोंढवा बु ता. हवेली) यांना अटक केली आहे. विशाल देवीचंद अगरवाल (वय ४६) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

आरोपी सिया गोयल हिने स्वतःचा १९ जूनला असलेला वाढदिवस साजरा करण्यासाठी १८ जूनलाच प्री बर्थ डे लोहगडावर नियोजन केले होते. मात्र, तिच्या मनात वाढदिवसाऐवजी केतनचा खून करण्याचा प्लॅन फिट बसलेला होता. खुन करण्यापूर्वी तिने गुगलवर प्लॅनिंगची माहिती वाचून काढली. खून कसा करायचा, ट्रेकला गेल्यानंतर केलेला खून नैसर्गिक मृत्यू भासवण्यासाठी काय करायचे, असे सर्च केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यानंतर तिने गुगलने दिलेल्या माहितीप्रमाणेच प्रियकर चेतन चौधरी याला तयार केले. अंगात हुडी, फेसमास्क लावून तो खुनासाठी तयार झाला होता.

गडावर ३४ अंश तपमान, हुडी फेसमास्क अन माकडउडी

लोहगडावर १८ जूनला दुपारी बाराच्या सुमारास साधारणपणे ३४ अंश सेल्सियस तपमान होते. एवढ्या कडक उन्हात तरूणाला हुडी आणि फेसमास्कची गरज का भासत आहे. तीन ते चार सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित तरूण सारखा का दिसून येत आहे, अशा विविध प्रश्नांनी पोलिसांना तरूणावर लक्ष केंद्रीत करण्यावर भाग पाडले. दरम्यान, केतन आणि सिया बोलत असताना आरोपी चेतन त्यांचा पाठलाग करीत होता. त्यातच एका ठिकाणी सियाने आपला बॉयफ्रेंड आला की नाही, याची खातरजमा केली असता, बाजूने जाणार्‍या आरोपी चेतनने माकडउडी मारून तिला इशारा केला, हे सुद्धा सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढल्याने त्यांनी आरोपी चेतनला ताब्यात घेतले.

आधी सेल्फी, व्हिडिओ मग धक्का

होणार्‍या नवर्‍यासोबत आपण किती आनंदी आहोत हे भासवण्यासाठी सियाने केतनसोबत आधी फोटो, व्हिडिओ काढले. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या प्रियकर चेतनला तिने इशारा करून जवळ बोलावले. अवघ्या काही क्षणात दोघांनीही केतनला तब्बल ४०० फुट उंचीवरील कठड्यावरून ढकलून देत त्याचा काटा काढला. पोलीस तपासाची कटकट मागे लागू नये, यासाठी तिने आपला होणारा नवरा पाय घसरून पडल्याचा बनाव पोलिसांना सांगितले होते. तपासाअंती दोघांनी मिळून खून केल्याचे उघडकीस आले आहे.

साखरपुडा झाला, बदनामी टाळण्यासाठी खून

साखरपुडा झाला होता, तू मुलाला किंवा त्याच्या कुटूंबियाला सांगून लग्न टाळू शकली असती. तू निरपराध मुलाचा जीव का घेतलास, अशी विचारणा पोलिसांनी तिला केली. त्यावेळी सियाने आमच्या कुटूंबात साखरपुड्याला खूप किंमत आहे. जर आम्ही लग्न मोडले असते, तर माझ्या कुटूंबियाची खूप बदनामी झाली असती, असे उत्तर तिने दिल्याचे पोलीस अधिकार्‍याने सांगितले. बदनामी टाळण्यासाठी हे कृत्य केल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे.

आरोपी सिया, चेतनवर नेटिझन्सचा संताप

निरपराध मुलाचा खून केल्यामुळे आरोपी सिया आणि बॉयफ्रेन्ड चेतनवर नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे. तुला खून करण्याचा अधिकार कोणी दिला, तू साखरपुडा का मोडला नाही, लग्नाच्या कार्याला कलंक का लावला, तूला समाजात जगण्याचा अधिकार नाही, दोघांनाही जन्मठेप झाली पाहिजे, तुमच्या सारख्या लोकांच्या वृत्तीमुळे गुन्हेगारीला पाठबळ मिळत आहे, यासारख्या शेकडो कमेंट, पोस्टद्वारे नेटकर्‍यांनी सोशल मीडियावर राग व्यक्त केला आहे. आरोपी सिया आणि तिचा बॉयफ्रेंडचा निषेध व्यक्त केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×