Breking News
अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची ७४ लाखांची फसवणूकगुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ५५ लाखांची फसवणूकपुण्यात फरार गुंडाच्या बेकायदा हाॅटेलवर बुलढोझरबळीराजाला मोठा दिलासा; शेतीकामासाठी माती, मुरूमावरील रॉयल्टी रद्दराज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्धार – विशेष लेखमहाकर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा, लाभ मिळेपर्यंत व्याज आकारू नयेतखाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान लागूनाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार, प्रसिद्धी कराविषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरेविकसित भारत-रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची ७४ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून तरुणीची ७ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – अटकेची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची ७४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ५५ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कोथरूड भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून पोलीस असल्याची बतावणी केली होती. बँक खात्याचा वापर काळ्या पैसे व्यवहारात झाला असून, या प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची भीती चोरट्यांनी दाखविली होती. या प्रकाराची माहिती कोणाला देऊ नये, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. अटकेची कारवाई न होण्यासाठी तातडीने बँक खात्यात पैसे जमावे करावे लागतील, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले.

त्यानंतर चोरट्यांच्या खात्यात त्यांनी वेळोवेळी ७४ लाख रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×