Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ५५ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिष; ज्येष्ठाची १ कोटींची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची ५५ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात फरार गुंडाच्या बेकायदा हाॅटेलवर बुलढोझर – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कर्वेनगर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारात गुंतवणूक योजनांची माहिती देऊन त्यांना जाळ्यात ओढले. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी पैसे जमा केले. चोरट्यांनी त्यांना परतावा देण्यात आल्याचे भासविले. प्रत्यक्षात मात्र, त्यांना परतावा दिला नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.

किरकोळ वादातून एकाचा खुनाचा प्रयत्न

पुणे-किरकोळ वादातून एकावर चाकूने वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना विमाननगर भागात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रोहित राममनी गुप्ता (वय २७, सध्या रा. कपिलानगर, रामवाडी, येरवडा. मूळ रा. बेलाखारा, जि. रायबरेली, उत्तर प्रदेश ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता हा विमाननगर भागातील एका चायनीजत खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हाॅटेलमध्ये आचारी म्हणून काम करतो. गुरुवारी (२ जून) सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो हाॅटेलजवळ थांबला होता. त्यावेळी त्याच्या ओळखीतील दोघा आरोपींनी काही कारण नसताना गुप्ता याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याच्यावर चाकूने वार करुन आरोपी पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×