Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

पुरावा मिळू नये म्हणून बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडने रचला कट

Ketan Agarwal Murder Case

केतनच्या खून प्रकणात आता मानसशास्त्रीय पध्दतीचा वापर

marathinews24.com

पुणे – व्यावसायिक केतन अगरवाल याच्या खूनाचा गुन्ह्याचा कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी संपूर्ण कट रचल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. अग्रवाल खून प्रकरणाचा उलगडा करताना ग्रामीण पोलिसांनी पारंपरिक ‘पोलिसी खाक्या’चा अवलंब न करता मानसशास्त्रीय पद्धतीने चौकशी केली. आरोपींच्या वर्तनाचा अभ्यास, त्यांच्या प्रश्न विचारले. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपी हळूहळू बोलते झाले आणि नियोजनबद्ध हत्येचा संपूर्ण कट उघडकीस आला.

अपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार – सविस्तर बातमी 

केतन अगरवालचा दि. १८ जूनला लोहगडावर अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव सिया गोयलने केला होता. मात्र, सुरुवातीपासूनच केतनच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या संशयामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. त्यातच बाली येथे होणार्‍या प्री-वेडिंग शूटपूर्वी केतनचा पासपोर्ट हरवल्याची बाब आणि लोहगडाच्या प्रवेशद्वाराजवळ भर उन्हात हुडी जॅकेट परिधान करून, चेहरा झाकलेली संशयित व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला. पुणे ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपासाला गती दिली. मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड, डिजिटल पुरावे आणि दोघांच्या हालचालींचे विश्लेषण केले. घटनेपूर्वी व घटनेनंतरच्या त्यांच्या संपर्कातून अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या. त्यामुळे हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचे पोलिसांना स्पष्ट झाले.

सिया आणि चेतन यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर दोघांची स्वतंत्रपणे कसून चौकशी केली. तपासात दोघांकडून पोलिसांना मिळती जुळती उत्तरे मिळाली. मात्र, पोलिसांनी मानसिक, भावनिक आणि परिस्थितीजन्य प्रश्नांचा आधार घेत चौकशीची दिशा बदलली. त्यांच्या उत्तरांमधील साम्यता, जुळता घटनाक्रम आणि उपलब्ध पुरावे यांची सांगड घालत पोलिसांनी कटाचा उलगडा केला. दोघांनी केलेले बनावानंतर पोलिसांना पुरावा मिळाला. सिया आणि चेतन यांच्यात झालेल्या फोनवरील संभाषणांसह चॅटिंगचे महत्त्वाचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले. डिजिटल पुराव्यांमुळे गुन्ह्याची साखळी अधिक भक्कम झाली आहे.

सियाला नेउन लुल्लानगरात सिन रिक्रिएशन

केतन अगरवालला लोहगडावरून ढकलण्यापूर्वीच आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी ३० मे पूर्वी आणि नंतर कोढवा परिसरातील लुल्लानगरातील फकरी रस्ता-बकरी होळ परिसरात प्रत्यक्ष सराव केल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यानंतर संपूर्ण नियोजन करून १८ जूनला केतनला लोहगडावर नेऊन दरीत ढकलण्यात आले. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरूवारी (दि. २) जुलै सियाला घटनास्थळांसह लुल्लानगर परिसरात नेऊन क्राईम सीन रिक्रिएशन केले. प्रक्रियेत आरोपींकडून संपूर्ण घटनाक्रमाची पुनर्रचना केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×