Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभात तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा सन्मान-सचिन हाके

राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभात तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा सन्मान-सचिन हाके

बारामती तालुक्याच्या कृषी क्षेत्राला राज्यस्तरीय मान्यता; तीन शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचे कृषी पुरस्कार

marathinews24.com

बारामती – कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभ १ जुलै रोजी सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी (मुंबई) येथे आयोजित करण्यात आला; यामध्ये तालुक्यातील तीन शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले.

केंद्राच्या शाळांनाही नियमांचे बंधन हवे-डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले.

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने काटेवाडीचे यतीन घुले सन्मानित

यामध्ये ऊस व केळी पिकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच शास्त्रीय पीक व्यवस्थापनाचा अवलंब करून उत्पादनात सातत्याने वाढ साधणारे आणि इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे काटेवाडी येथील यतीन बापुराव घुले यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने तांदुळवाडीचे योगेश नालंदे सन्मानित

कृषीविषयक योजना, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीविषयक माहितीचा प्रसार करणाऱ्या ‘शेतकरी योद्धा’ वृत्तपत्राचे संस्थापक तांदुळवाडी येथील योगेश नामदेव नालंदे यांना ‘वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

जिजामाता कृषीभूषण पुरस्काराने कुरणेवाडीच्या छाया पवार सन्मानित

महिला शेतकऱ्यांसाठी दिला जाणारा ‘जिजामाता कृषीभूषण पुरस्कार’ कुरणेवाडी येथील छाया तानाजी पवार यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी सोयाबीन, हरभरा, ऊस आदी पिकांचे सुधारित वाण, स्वतःच्या शेतात बीजोत्पादन, तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद, शेंगदाणे व कडधान्य पिकांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धनाच्या व्यवसायातून उल्लेखनीय प्रगती साधली आहे.

या पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांच्या सन्मानामुळे तालुक्याच्या कृषी क्षेत्राच्या कार्याला राज्यस्तरावर दखल घेतली आहे, या यशस्वी शेतकऱ्यांच्या कार्यातून इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×