Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

पुण्यात फ्लाईंग जिप्सी कॅफेवर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची मर्जी

पुण्यात फ्लाईंग जिप्सी कॅफेवर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची मर्जी

महिन्यात ६ खटले दाखल, तरीही उपनिरीक्षकाचेच निलंबन

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती फर्ग्युसन कॉलेज रोडवर असलेल्या फ्लाईंग जिप्सी कॅफेवर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची मर्जी असल्याचे दिसून आले आहे. एकाच महिन्यांत तब्बल ६ वेळा डेक्कन पोलिसांनी खटले दाखल करूनही संबंधित कॅफे चालकाची मस्ती उतरली नाही. २३ मे ला पहाटे पावणेचार वाजेपर्यंत त्याने कॅफे उघडे ठेउन पोलिसांवर शिरजोरी केली. दरम्यान, ६ जूनलाही त्याने नियमांचे उल्लंघन करीत कॅफे उघडे ठेवले होते. त्यामुळे ड्युटीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम यांनी धाव घेउन कॉफीचे ३ ग्लास काठीने उडवले. याप्रकरणी त्यांना थेट निलंबित केले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याप्रकरणी लक्ष घालून न्याय देण्याची मागणी केली जात आहे.

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक सविस्तर बातमी 

फ्लाईंग जिप्सी कॅफे ६ जूनला रात्री पावणेदोन पर्यंत सुरू असल्यामुळे उपनिरीक्षक कदम त्याठिकाणी गेले. त्यांनी ग्राहकांना शांतपणे बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे काउंटरवर असलेले ३ कॉफीचे ग्लास काठीने उडवून त्यांनी राग व्यक्त केला. याची शिक्षा म्हणून कदम यांना निलंबित करण्याचे आदेश अपर आयुक्त राजेश बनसोडे यांनी दिले. दरम्यान, संबंधित फ्लॉईंग जिप्सी कॅफे मालकाविरूद्ध अनेक तक्रारी असून, त्याच्याविरूद्ध विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला वठणीवर आणण्यासाठी आणि नियमांचे पालन करण्यासाठी गेलेल्या उपनिरीक्षक कदम यांना निलंबित केल्यामुळे सोशल मीडियातूनही नाजारी व्यक्त केली जात आहे. कॉफीचे ३ ग्लास उडवले म्हणून निलंबन, मग रात्री पावणेदोन वाजेपर्यंत आस्थापना नियमांचे उल्लंघन करणारा फ्लाईंग जिप्सी कॅफे चालक कोणाच्या आशीवार्दाने दादागिरी करीत आहे, असाही सवाल नेटकर्‍यांनी केला आहे.

माझ्या इथे यायचे नाही, अलिखित नियमच

नियमानुसार रात्री दीडवाजेपर्यंत आस्थापना सुरू ठेवण्याची परवागी आहे. त्यानंतरही माझ्या फ्लॉईंग जिप्सी कॅफेत कोणताही पोलीस अधिकार्‍याने यायचे नाही, असा अलिखित नियमच संबंधित मालकाचा असल्याची माहिती बीट मार्शलांनी दिली आहे. त्यामुळे जर कोणी अधिकारी-कर्मचारी हे कॅफे बंद करण्यास गेल्यास त्याच्याविरूद्ध कटकारस्थान केले जात आहे. दरम्यान, कॅफे मालकाविरूद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, आस्थापना नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे. मात्र, याची सगळी शिक्षा पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम यांना का दिली, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सोशल मीडियावर नेटीझन्सकडून नाराजी

मध्यरात्री पावणेदोन वाजता कॅफेमध्ये तरूण-तरूणी काय करीत होते, कायद्याचा धाक आहे का नाही, असा सवाल सुदेश देवकर यांनी एक्सवर उपस्थित केला आहे. तर विश्वास खोड यांनीही पोलीस उपनिरीक्षकाचे समर्थन केले आहे. प्रशांत मोरे, संतोष शिंदे, नितीन काळवेकर, मयूर बेले, इस्माईल खान, भारत बोथरा यांनी उपनिरीक्षक कदम यांच्यावरील झालेली निलंबनाची कारवाई चुकीची असल्याचे नमूद केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×