Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरे

विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरे

कृषी दिनानिमित्त राज्य व तालुकास्तरीय पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान; सेंद्रिय शेती, पीक विमा आणि शेतकरी उत्पादक गटांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन

marathinews24.com

बारामती – काळाची गरज लक्षात घेता सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यावर भर दिला पाहिजे. रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिवापर टाळून विषमुक्त अन्नधान्य, फळे आणि भाजीपाल्याचे उत्पादन वाढविणे ही आजची गरज आहे. नागरिकांनीही विषमुक्त फळे व भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी केले.

विकसित भारत-रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ – सविस्तर बातमी 

राज्याचे मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै रोजी पंचायत समिती येथे कृषी दिन साजरा साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती शुभांगी आगवणे, गटनेते बाबा चोरमले, सदस्य नितीन काकडे, उज्जवला खैरे, आशा वायाळ, उप विभागीय कृषी अधिकारी रश्मी जोशी, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका कृषी अधिकारी सचिन हाके, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. धीरज शिंदे व विषय विशेषज्ञ संतोष करंजे, शेतकरी सन्मान समितीचे अध्यक्ष अशोक तावरे, आदी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील शेतकऱ्यांनी सूर्यफूल, बाजरी, सोयाबीन या पिकामध्ये राज्यस्तरीय तसेच तालुकास्तरीय पीक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये कऱ्हाटी येथील नारायण बाबा लोणकर यांनी सुर्यफूल पीकात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय 50 हजार रुपयांचे बक्षीस मिळविले आहे, यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले. चारेमले यांनी बदलत्या हवामानचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी शेती करावी. कृषी विभागाच्या सल्ला विचारात घेता पीकाचे नियोजन करावे, असेही श्री. चोरमले म्हणाले.

माने म्हणाले, गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येवून शेतकरी उत्पादक गट तयार तयार करावा. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले. हाके यांनी कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देवून ते पुढे म्हणाले, फळ पिकांचा शेतकऱ्यांनी विमा काढून घ्यावा. हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना या विम्याचा लाभ होईल, असेही हाके म्हणाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×