Breking News
विशेष मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरत आहे ‘साहस फाउंडेशन’गणेशभक्तांसाठी मोफत पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन सेवापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ – विशेष लेखकोथरूडमध्ये तरुणावर शस्त्राने वार; तिघांविरुद्ध गुन्हापुण्यात वस्त्रदालनातून साडेचार लाखांची रोकड लंपासगोळीबार करणारा बिष्णोई टोळीतील एक जण ताब्यातपालखी सोहळ्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून पाच हजारांचा बंदोबस्तसिंहगड किल्ला, वरंधा घाटात दरड कोसळलीविवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे आवाहनपवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार

गणेशभक्तांसाठी मोफत पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन सेवा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टला इलेक्ट्रिक वाहन प्रदान

marathinews24.com

पुणे – श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना उन्हाची, पावसाची किंवा ज्येष्ठांसाठी चालण्याची गैरसोय होऊ नये, तसेच त्यांचा मंदिरापर्यंतचा प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी व्हावा, या उद्देशाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनाची देणगी देण्यात आली. शनिवार वाडा ते दगडूशेठ गणपती मंदिर मार्गावर ही सेवा मोफत मिळणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ – सविस्तर बातमी

गणेशभक्तांच्या सेवेसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला ‘एका eka मोबिलिटी’ कडून हे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन नुकतेच प्रदान करण्यात आले. सुधीर मेहता यांच्या कंपनीच्या वतीने हे वाहन ट्रस्टला सुपूर्द करण्यात आले असून त्याचा स्वीकार ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांसह इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ‘एका eka मोबिलिटी’च्या सुनंदा मेहता, अरिहंत मेहता उपस्थित होते.

या वाहनाचा वापर पहिल्या टप्प्यात शनिवारवाडा ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर या मार्गावर गणेशभक्तांच्या मोफत प्रवासासाठी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुणे रेल्वे स्थानक, एसटी स्थानक आदी ठिकाणांहून बाहेरगावाहून येणाऱ्या गणेशभक्तांना मंदिरापर्यंत पोहोचविण्यासाठीही ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, गणेशभक्तांच्या सेवेसाठी हे अत्यंत आरामदायक व पर्यावरणपूरक वाहन उपलब्ध झाले असून वाहनाच्या उपयोगितेचा खर्चही अत्यंत कमी आहे. या वाहनाचा खर्च सुमारे ५० पैसे प्रति किलोमीटर इतका असल्याने ही सेवा अधिक परिणामकारकपणे राबविणे शक्य होणार आहे.

अरिहंत मेहता म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टसोबत जोडले जाणे हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. गणेशभक्तांच्या सेवेसाठी ही मोफत सेवा सुरू करताना आम्हाला समाधान वाटत आहे. शनिवारवाडा ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर या मार्गावर इलेक्ट्रिक वाहन सेवा सुरू करण्यात येत असून भविष्यात ट्रस्टच्या सहकार्याने ही सेवा अधिक व्यापक करून अधिकाधिक भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहील.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×