Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

संविधानाचा अवमान करणाऱ्यांच्या निषेधार्थ २० ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अवमानाचा निषेध; पुण्यात २० ऑगस्टला संविधानवादी नागरिकांचे धरणे आंदोलन

marathinews24.com

पुणे – भारतीय संविधान आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचा अवमान करणाऱ्या जातीयवादी प्रवृत्तीच्या विरोधात पुणे शहर, जिल्ह्यातील सर्वपक्षीय संविधानवादी नागरिकांच्या वतीने २० ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.

म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती – सविस्तर बातमी

यावेळी कॉँग्रेस पक्ष अनुसूचित जाती विभागाचे पुणे (पूर्व विभाग) शहराध्यक्ष कुणाल राजगुरू, विठ्ठल गायकवाड, माजी नगरसेविका लता राजगुरू, संग्राम रोहम आदि मान्यवर उपस्थित होते.

देशाच्या घटनात्मक सर्वोच्च पदावर असलेले वरिष्ठ संसदीय सभागृहाचे सदस्य व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते तसेच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे ८ ऑगस्ट २०२६ रोजी विजय शंखनाद रॅलीच्या कार्यक्रमासाठी उत्तराखंड मधील हलदानी येथील  रामलीला मैदानावर उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर जातीयवादी प्रवृत्तीच्या काही लोकांनी गोमूत्र शिंपडून मैदान पवित्र केल्याचा दावा केला आहे, ही कृती म्हणजे केवळ मल्लिकार्जुन खर्गे यांचाच नव्हे तर भारतीय संविधानाचा अवमान असल्याचे समितीने म्हटले आहे.

या घटनेच्या निषेधार्थ गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत डॉ. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, पुणे येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×