Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

गणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदम

गणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदम

गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘तंबाखूमुक्त पुणे–व्यसनमुक्त पुणे’चा संदेश; युवक, विद्यार्थी व गणेश मंडळांच्या सहभागातून जनजागृती अभियान

marathinews24.com

पुणे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या “व्यसनमुक्त महाराष्ट्र” या संकल्पनेला चालना देण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या “व्यसनमुक्त महाराष्ट्र” अभियानास बळकटी देण्यासाठी सर्व संबंधित विभाग, संस्था व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन कदम यांनी केले.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १९, २०, २६ व २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिरे – सविस्तर बातमी 

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय यांच्यावतीने जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भाग्यश्री पाटील, भाई प्रतिष्ठानचे डॉ. शंतनु जगदाळे, लखन वाघमारे, जिजाऊ फाऊंडेशनच्या ज्योती ढमाळ तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

युवकांमध्ये तंबाखू व अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी समन्वित प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागातून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी पोस्टर अभियान, जनजागृती फलक, घोषवाक्ये, बॅनर्स तसेच “तंबाखूमुक्त पुणे – व्यसनमुक्त पुणे” या संदेशाचा व्यापक प्रसार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्था व युवकांच्या माध्यमातून जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आले.

या उपक्रमामध्ये सहभागी होणारे विद्यार्थी, स्वयंसेवक तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासाठी ओळखपत्रे (Identity Cards) उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यानुसार, जिल्हा रुग्णालयाकडून उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थी, स्वयंसेवक व प्रतिनिधींना अधिकृत ओळखपत्रे प्रदान करण्यात येतील, असे बैठकीत ठरविण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×