वानवडी पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – शहरातील हडपसर परिसरातील दोन सराइतांना परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले. मुसा अबू शेख (वय २५, रा. आनंदनगर, रामटेकडी, हडपसर), अशोक महादेव राऊत (वय २८, रा. सुरक्षानगर, हिंगणे मळा, हडपसर) अशी तडीपार करण्यात आलेल्या सराइतांची नावे आहेत. शेख याच्याविरुद्ध मारामारीचे चार गुन्हे दाखल आहेत. राऊत याच्याविरुद्ध गावठी दारू विक्री प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
क्रेडीट कार्डची बतावणी, जेष्ठाला ६ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
दोघांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती. शेक आणि राऊत यांना पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव वानवडी पोलिसांनी तयार केला. संबंधित प्रस्ताव पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. दोघांना शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.
मागील तीन महिन्यात वानवडी पोलिसांनी १४० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) तीन गुंडांविरुद्ध कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये गुंड टोळीविरुद्ध कारवाई करण्यात आली. ६ सराइतांना तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.सहायक पोलीस आयुक्त रामदास इंगवले, वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, उपनिरीक्षक समाधान उगले, पांडुरंग कदम, यतिन भोसले, शीतल आखाडे यांनी ही कारवाई केली.
























