कोंढव्यात कारवाई
marathinews24.com
पुणे – मेफेडॉन (एमडी ) विक्रीच्या तयारीत असलेल्या तिघाजणांना अमली पदार्थ विरोधी पथक एकने कोंढव्यातील शिवनेरीनगरातून अटक केली. त्यांच्याकडून ५९ ग्रॅम एमडी, दोन मोबाइल असा २ लाख ८० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. तासीन आलम शेख (वय १९) आयान समीर शेख (वय २१) आरिफ मुस्तफा शेख (वय २४ तिघेही रा. शिवनेरीनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपार – सविस्तर बातमी
अमली पदार्थ विरोधी पथक एक कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी शिवनेरी नगरात थांबलेले तिघेजण पोलिसांना पाहून पळून जाऊ लागले. पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत ५९ ग्रॅम एमडी, दोन मोबाइल असा पावणेतीन लाखांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी उपायुक्त हसन गौहर, एसीपी शंकर खटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, उपनिरीक्षक योगेश कोतकर, राहूल मद्देल, संजय राजे, अमोल सरडे, किरण जाधव, नीलेश जाधव, अतुल क्षीरसागर, आशा भिंगारे यांनी केली.
























