Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलत

भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलत पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवारांना थेट सहभागाची संधी

पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवारांना थेट सहभागाची संधी

marathinews24.com

पुणे – राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. या समितीच्या माध्यमातून भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करण्यात येत असून, पुणे विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा आणि विषयतज्ज्ञांशी थेट संवाद साधण्यासाठी शनिवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी जिओलॉजी सभागृह, पहिला मजला, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथे सल्लामसलत आयोजित करण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर – सविस्तर बातमी 

पुणे हे राज्यातील स्पर्धा परीक्षा तयारीचे महत्त्वाचे केंद्र असल्याने, भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणा सुचविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील उमेदवारांचा प्रत्यक्ष सहभाग या सल्लामसलतीत महत्त्वाचा ठरणार आहे. हा संवाद कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे शनिवार १२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे. पुणे जिल्ह्यासह पुणे महसूल विभागातील संबंधित घटकांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

परीक्षा प्रक्रियेतील अडचणी, अनुभव आणि सूचनांवर चर्चा

भरती परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी व उमेदवारांचे अनुभव, अडचणी, अपेक्षा आणि सुधारणा सूचना समिती जाणून घेणार आहे. प्रश्नपत्रिका व परीक्षा केंद्र व्यवस्थापन, परीक्षेची सुरक्षितता व विश्वासार्हता, तंत्रज्ञानाचा वापर, उमेदवारांशी संवाद, तक्रार निवारण आणि परीक्षा अनुभव यांसह भरती परीक्षा पद्धतीशी संबंधित विविध विषयांवर सूचना मांडता येणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×