Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सायबर चोरट्यांकडून महिलेची १४ लाखांची फसवणूक

ऑनलाईनरित्या वाहनाचा व्यवहार फसला

कामाचे आमिष दाखवत महिलेची ऑनलाईन फसवणूक

marathinews24.com

 पुणे – घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी कात्रज भागातील एका महिलेची १४ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरण चोरट्यांविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पुणे : ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेले – सविस्तर बातमी 

याबाबत एका महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारादार महिला आंबेगाव खुर्द परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांना गेल्या वर्षी संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने घरातून काम केल्यास दररोज दोन ते तीन हजार रुपये मिळतात. समाज माध्यमातील चित्रफिती, तसेच मजकुरास दर्शक पसंती मिळवून दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला ऑनलाइन काम (ऑनलाइन टास्क) दिले. महिलेने काम पूर्ण केल्यानंतर चोरट्यांनी तिला परताव्यापोटी चार हजार ९२० रुपये दिले. त्यामुळे महिलेचा विश्वास बसला.

ऑनलाइन टास्कमध्ये आणखी रक्कम गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. महिलेने चोरट्यांच्या बँक खात्यात गेल्या सात ते आठ महिन्यात वेळोवेळी १४ लाख २५ हजार रुपये गुंतविले. पैसे गुंतविल्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिणे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×