सायबर चोरट्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी केला गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – अटकेची भीती दाखवून सायबर (Pune Crime News) चोरट्यांनी वडगाव शेरी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची १९ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे.
खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे वडगाव शेरी भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी (Pune Crime News) त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. चोरट्याने पोलीस असल्याची बतावणी केली. नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावरुन नागरिकांना अश्लील छायाचित्रे पाठविण्यात आली आहेत. या प्रकरणात अटक करण्यात येणार आहे, अशी भीती दाखविली. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे चोरट्याने त्यांनी सांगितले. त्यानंतर चोरट्याने त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्याने खात्यातून १९ लाख २० हजार रुपयांची रोकड चोरली. खात्यातील रक्कम दुसऱ्या एका खात्यात जमा झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप तपास करत आहेत.
पुणे स्टेशन परिसरात पादचाऱ्याला लुटले
पुणे स्टेशन परिसरात पादचाऱ्याला धमकावून लुटण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी तीन चोरट्यांविरुद्ध (Pune Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे अहिल्यानगरमध्ये राहायला आहेत. ते रविवारी (२० सप्टेंबर) मध्यरात्री एकच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील अलंकार चित्रपटगृह चौकातून निघाले होते. त्या वेळी तिघांनी त्यांना अडवले. पादचाऱ्याला धमकावून चोरट्यांनी त्यांना अंधारात ओढत नेले. तक्रारदाराला धमकावून त्याच्याकडील तीन हजार रुपयांची रोकड लुटून चोरटे पसार झाले. घाबरलेल्या पादचाऱ्याने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक गणेश वानखडे तपास करत आहेत.























