गुन्हे शाखेच्या युनीट एकने केली अटक
marathinews24.com
पुणे – दहशत माजविण्यासाठी कोयता (Koyta Case Pune) बाळगणार्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनीट एकने अटक केली आहे. त्याच्याकडून धारदार शस्त्र जप्त केले आहे. ऐन गणेशोत्सवात त्याने नागरिकांना वेठीस धरण्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. प्रथमेश शंभू मोरे (वय १८ रा. दांडेकर पुल) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट एककडून हद्दीत पेट्रोलिंग सुरू होते. त्यावेळी पोलीस अमलदार संतोष नागरे यांना हुजूरपागा शाळेजवळ आरोपी प्रथमेश मोरे हा साथीदारांसह थांबल्याची माहिती मिळाली. (Koyta Case Pune) तो गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे समजात पोलिसांनी प्रथमेशला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयता जप्त केला. ही कामगिरी उपायुक्त गौहर हसन, एसीपी शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, धीरज राउत, प्रमोद जगताप, सचिन कोळी, रेवन्नाथ भुजबळ, बाबासाहेब दांगडे, संतोष अनुसे यांनी केली.
गंभीर गुन्हा करणार्याला बेड्या
(Koyta Case Pune) शरीराविरुद्ध गंभीर गुन्हा केल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनीट एकने अटक केले आहे. अबालु जाफर इराणी (वय ५०, रा. शिवाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने दोन महिन्यापुर्वी पाटील इस्टेट परिसरात एकाला बेदम मारहाण करुन त्यांच्या आईला धमकी दिली होती. तो खडकी परिसरात आल्याची माहिती मिळताच पथकाने इराणीला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कामगिरी केली.






















