Breking News
Census 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा26/11 Mumbai Attack Martyrs Tribute Pune : पुणे शहर पोलिसांसह पुणेकरांची मुंबई २६ / ११ हल्ल्यातील हुतात्म्यांना मानवंदनाPune Vigyan Nandi Sammelan : विज्ञान साहित्यात ज्ञानभाषा व लोकभाषेचा संगम व्हायला हवाBaburao Shewale Hospital : लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळेPune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Pune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाही

Pune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाही

तीन कंपन्यांच्या हितासाठी चार्टर्ड अकाउंटंटची हुशारी अंगलट; गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बनावट कागदपत्रे आणि ऑडिट अहवाल तयार करून पुण्यातील दोन चार्टर्ड अकाउंटंट (सीए) यांनी तीन कंपन्यांसाठी शासनाचा कोट्यावधींचा कर बुडवला आहे. त्यांनी कंपन्यांचे तब्बल ४ हजार ४२७ कोटी ९३ लाख रुपये परदेशात पाठवून शासनाचा कर न जमा करता (Pune Tax Fraud) फसवणूक केली आहे. ही घटना २०२२ ते सप्टेंबर २०२६ कालावधीत कात्रज कोंढवा रोडवरील शिवसमृद्धी आर्वेâड इमारतीतील कार्यालयात घडली आहे. तीन कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी आरोपींनी बनावट १५ सीबी आणि १५सीए फॉर्म तयार करुन पोर्टलवर अपलोड केले आहेत. त्यानुसार येवलेवाडी पोलिसांनी दोन सीएंविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणी – सविस्तर बातमी 

एमएस ओडी अँड असोसिएट्स फर्मचे अंकुश कुमार सुरेशचंद बागरेचा ( वय ३४ रा. अचलनगर, कोंढवा) आणि मोहित शिवकुमार तोडी ( वय ३३ रा. कोंढवा बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक आयकर निदेशक तन्मयी सुहास देसाई (वय ३१) यांनी कोंढवा बुद्रूक येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ३१८(४), २३४, २२९ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बागरेचा आणि तोडी हे चार्टर्ड अकाउंटंट् असून, सन २०२२ ते २०२६ कालावधीत त्यांनी संगणमत केले. कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या मात्र प्रत्यक्षात कर्मचारी नसलेल्या बोगस (Pune Tax Fraud) कंपन्यांच्या व्यवहारांशी संबंधित अधिकृत कागदपत्रे तयार केली. त्यानंतर मागील चार वर्षांत आरोपींनी परदेशात पैसे पाठवण्यासाठी आवश्यक असलेली बनावट फॉर्म १५ सीबी प्रमाणपत्रे तयार केली. ही प्रमाणपत्रे आयकर विभागाकडे खरी असल्याचे भासवून सादर केली.

(Pune Tax Fraud) तसेच फॉर्म १५ सीए प्रमाणपत्र तयार करण्याचे अधिकार नसतानाही त्यांनी ते तयार करून पोर्टलवर सादर केले. फसवणूकीच्या उद्देशाने आरोपींनी तीन कंपनींच्या फायद्यासाठी चार वर्षात तब्बल ४,४२७ कोटी ९२ लाख ४४ हजार ४०८ रुपये परदेशात पाठवून शासनाचा कर बुडवला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×