Breking News
Pune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमक

आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त शासकीय रुग्णालयात जनजागृतीपर उपक्रम

‘मौन तोडा, संवाद सुरू करा, ऐका, साथ द्या, मदतीशी जोडा’; विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

marathinews24.com

बारामती – जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बारामती येथील मानसोपचार विभागाच्या वतीने विविध जनजागृतीपर उपक्रमांचे अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले. “आत्महत्येबद्दल बोलणे ही कमजोरी नसून मदतीकडे जाणारे पहिले पाऊल आहे (Suicide Prevention Day Baramati) योग्य वेळी सुरू झालेला एक संवाद एखाद्याचे जीवन वाचवू शकतो,” असा संदेश डॉ. पाटील यांनी दिला.

या उपक्रमांत आत्महत्येच्या प्रतिबंधासाठी संवाद, संवेदनशील ऐकणे आणि वेळेत मदत घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. “आत्महत्येबद्दलची कथा बदलूया!” या संदेशासोबत “मौन तोडा, संवाद सुरू करा, ऐका, साथ द्या, मदतीशी जोडा” हा संदेशही देण्यात आला.

वैद्यकीय तसेच नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पोस्टर, स्लोगन, निबंध व काव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाच्या परिसरात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी आत्महत्येची संभाव्य चेतावणीची लक्षणे, जोखमीची चिन्हे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली. मानसोपचार विभागातील तज्ज्ञांनी आत्महत्येचे विचार व्यक्त करणाऱ्या व्यक्तीचे शांतपणे व संवेदनशीलतेने ऐकून घेणे, गंभीर संकेतांकडे गांभीर्याने पाहणे, वेळेत मदत घेणे आणि आवश्यकतेनुसार मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी संपर्क साधणे याबाबत मार्गदर्शन केले.

अधिष्ठाता अंजली पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महाविद्यालय व रुग्णालयात छात्र मानस कक्ष कार्यरत असल्याची माहिती दिली. तसेच शैक्षणिक किंवा वैयक्तिक ताणतणावाचा सामना करताना समस्या मनात न ठेवता योग्य वेळी मार्गदर्शन व मानसिक आरोग्यविषयक मदत घेण्याचे आवाहन केले.

Suicide Prevention Day Baramati यावेळी मानसोपचार प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल डॉ. आदिती सातव व डॉ. रती तारापूर यांचा डॉ. अंजली पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास डॉ. विवेक सहस्रबुद्धे यांच्यासह मानसोपचार विभागातील डॉक्टर, वैद्यकीय व नर्सिंग विद्यार्थी तसेच रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×