Breking News
Constitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्ला

Yuvraj Khopade Gold Medal : लंडनच्या मातीत कुंजीर तालमीच्या पैलवान युवराज खोपडे यांचा डंका

Yuvraj Khopade Gold Medal : लंडनच्या मातीत कुंजीर तालमीच्या पैलवान युवराज खोपडे यांचा डंका

आंतरराष्ट्रीय केसरी कुस्ती स्पर्धेत 95 किलो वजनी गटात सुवर्णपदक

marathinews24.com

पुणे – Yuvraj Khopade Gold Medal : जागतिक कुस्ती संघटना (UWW) यांच्या मान्यतेने यूकेमधील लंडन येथे 23 ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय केसरी कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नाझरे गावचे सुपुत्र पै. युवराज मोहन खोपडे यांनी 95 किलो वजनी गटात दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. अंतिम लढतीत युवराज यांनी यूकेच्या पैलवानावर चितपट विजय मिळवत भारतीय पारंपरिक मातीवरील कुस्तीचा ठसा लंडनच्या मातीत उमटविला.

शाश्वत पर्यावरणपूरक बांधकामांना प्राधान्य ही काळाची गरज – सविस्तर बातमी 

युवराज खोपडे हे नाझरे गावचे सुपुत्र असून वस्ताद मोहन नाना खोपडे यांचे चिरंजीव आहेत. सध्या ते कुंजीर तालीम, पुणे येथे वस्ताद व उपमहाराष्ट्र केसरी विशाल कलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. Yuvraj Khopade Gold Medal तसेच मुळशी केसरी गणेश कंधारे आणि पप्पू वांजळे गायकवाड वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखालीही त्यांनी सराव केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत युवराज यांनी ताकद, चपळाई, अचूक डावपेच आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यावर मात केली.

युवराज यांच्या या सुवर्णकामगिरीमुळे नाझरे गावासह जयनाथ तालिमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.धनकवडी भागातील नगरसेवक बाळासाहेब धनकवडे व ॲड विजय खोपडे यांनी लहानपणी त्यांच्या कडून योग्य परिश्रम करून घेतले.ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये असलेली गुणवत्ता, जिद्द आणि क्षमता योग्य प्रशिक्षण व कठोर परिश्रमांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकते, हे युवराज यांच्या यशातून अधोरेखित झाले आहे.

Yuvraj Khopade Gold Medal युवराज यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघटनेचे अध्यक्ष नितीन बारणे, उपाध्यक्ष अमर गोगावले, सचिव मोहन नाना खोपडे आणि खजिनदार पोपट नलावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांचे आजोबा विलास दादा खोपडे यांच्या प्रेरणेने तसेच काका राजू खोपडे यांच्या मार्गदर्शनातून आणि पाठबळातून शक्य झाले आहे. तसेच त्यांचे प्रशिक्षक, कुटुंबीय, नाझरे ग्रामस्थ आणि पुणे जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींकडूनही युवराज यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लंडनच्या मातीत मिळवलेले हे सुवर्णपदक युवराज खोपडे यांच्या कुस्ती कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला असून, त्यांच्या या कामगिरीमुळे पुणे जिल्ह्यातील नवोदित मल्लांना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे. महाराष्ट्राच्या मातीत घडलेला हा मल्ल आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या मैदानावर आपली छाप उमटवत असल्याने ही कामगिरी पुणे जिल्ह्यासाठी अभिमानाची ठरली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×