Breking News
Constitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्ला

Pune Satyagraha March : गांधी जयंतीनिमित्त पुण्यात १७ किलोमीटर ‘सत्याग्रह मार्च’

Pune Satyagraha March : गांधी जयंतीनिमित्त पुण्यात १७ किलोमीटर ‘सत्याग्रह मार्च’

प्राणीमुक्ती आणि वनस्पतीआधारित आहाराचा संदेश

marathinews24.com

पुणे – Pune Satyagraha March:  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त पुणे ॲनिमल लिबरेशनच्या वतीने प्राणी हक्क, अहिंसा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी १७ किलोमीटरच्या सत्याग्रह पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत १२० हून अधिक तरुण, सजग नागरिक आणि प्राणीप्रेमींनी सहभाग घेतला. प्राण्यांवरील अत्याचार रोखणे, डेअरी उद्योगातील प्राण्यांच्या परिस्थितीबाबत जनजागृती करणे आणि वनस्पती-आधारित आहाराला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

‘जलसेवा संकल्प अभियानातून’ जलसाक्षरता व पाणी संवर्धनाला चालना – सविस्तर बातमी 

कोथरूड येथील गांधी भवन येथून सुरू झालेली ही पदयात्रा कर्वे पुतळा, डेक्कन, फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रस्ता, पुणे महानगरपालिका मुख्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे येरवडा येथील ऐतिहासिक आगाखान पॅलेस येथे पोहोचली. पांढऱ्या वेशभूषेतील कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने पदयात्रा काढत नागरिकांचे लक्ष वेधले.

या पदयात्रेदरम्यान विविध चौकांमध्ये प्राण्यांच्या वेदना, डेअरी उद्योगातील वास्तव आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाचे चित्रण करणारी खडू-कला साकारण्यात आली. या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.Pune Satyagraha March कार्यकर्त्यांनी पत्रकांचे वाटप करून विद्यार्थी, व्यावसायिक आणि नागरिकांशी संवाद साधला.

भारतीय संविधानातील कलम ५१ अ (g) नुसार सर्व सजीव प्राण्यांबद्दल दया बाळगण्याच्या कर्तव्याची आठवण करून देणे, तसेच प्राण्यांच्या हक्कांविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे, यावर या उपक्रमात भर देण्यात आला. आधुनिक पशुपालन आणि डेअरी उद्योगातील प्राण्यांच्या परिस्थितीबाबत जनजागृती करताना वनस्पती-आधारित आहाराचा पर्यायही मांडण्यात आला.

प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन

पदयात्रेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे विविध मागण्यांची निवेदने सादर करण्यात आली. प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे, जिल्हा प्राणी क्रूरता प्रतिबंधक समिती (SPCA) सक्रिय करणे, शासकीय खरेदीमध्ये वनस्पती-आधारित आहाराला प्रोत्साहन देणे, तसेच अस्वच्छ व बेकायदेशीर मांसविक्री केंद्रांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय, शैक्षणिक आणि व्यावसायिक संस्थांच्या कॅन्टीनमध्ये वनस्पती-आधारित खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे आणि विज्ञान प्रयोगशाळांमध्ये प्राण्यांच्या विच्छेदनाला पर्याय म्हणून डिजिटल सॉफ्टवेअरचा वापर करण्याची मागणीही करण्यात आली.

या वेळी प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी प्राण्यांबद्दलची संवेदनशीलता ही केवळ वैयक्तिक आहारापुरती मर्यादित न राहता सामाजिक आणि प्रशासकीय धोरणांमध्येही प्रतिबिंबित व्हावी, असे मत व्यक्त केले. प्राण्यांचे हक्क, पर्यावरणाचे संरक्षण आणि मानवी आरोग्य हे परस्परांशी जोडलेले विषय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आगाखान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी, महादेव देसाई आणि महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून सामूहिक अहिंसा संकल्पाने या सत्याग्रह पदयात्रेची सांगता झाली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×