Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Gandhi Jayanti Pune : महात्मा गांधींचा सत्याग्रह विश्वमानवतेसाठी – डॉ. उल्हास पवार

Gandhi Jayanti Pune : महात्मा गांधींचा सत्याग्रह विश्वमानवतेसाठी - डॉ. उल्हास पवार

डब्ल्यूपीयूमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

marathinews24.com

पुणे – Gandhi Jayanti Pune : संपूर्ण जग आज युद्धाच्या छायेत अस्वस्थ आहे. अशा वेळी गांधी जयंती ही संयुक्त राष्ट्रातर्फे जागतिक अहिंसा दिन म्हणून संपूर्ण जगात साजरी केली जाते, हे सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह हा मूलमंत्र गांधीजींनी दिला. गांधीजींचा सत्याग्रह हा विश्वमानवतेसाठी होता,” असे विचार ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. उल्हास पवार यांनी व्यक्त केले.

एसआयआर : हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; बीएलओ घरी येऊन कागदपत्रे स्वीकारणार – सविस्तर बातमी 

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, माईर्स एमआयटी शिक्षण समूह व पीस विभागाच्या वतीने संत ज्ञानेश्वर मंडपात आयोजित “स्मरण महामानवांचे” या अभिवादन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.

एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, एमआयटीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. एस. एन. पठाण, प्रा. डॉ. मिलिंद पात्रे, डॉ. महेश थोरवे, लेखक अनिल जोशी, डॉ. विनोदकुमार जाधव, विष्णू भिसे, कर्नल तांदळे आणि बिपीन जोशी उपस्थित होते.

डॉ. उल्हास पवार म्हणाले, “गांधीजींनी अस्पृश्यता निवारणाला प्राधान्य दिले. सर्वधर्मसमभाव आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचा विचार समाजात रुजावा, तसेच भारतातील कोणताही समाज जाती आणि धर्माच्या आधारावर विभागला जाऊ नये, असा त्यांचा विचार होता. मानवता, समता व नैतिकता या तीन मूल्यांवर आधारित सत्याग्रहातून संघर्ष उभा करण्याचे तत्त्व न्या. रानडे यांनी गांधीजींना दिले. लाल बहादूर शास्त्री हे गांधीजींचे शिष्य होते. शांतता, नम्रता आणि तत्त्वांप्रती निष्ठा ठेवून शास्त्रींनी देशसेवा केली. गांधी आणि शास्त्रींच्या विचारांची जाणीव ठेवून त्याच मूल्यांवर डॉ. विश्वनाथ कराड यांचे कार्य सुरू आहे.”

Gandhi Jayanti Pune विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “सत्य, अहिंसा आणि शांती हेच खरे मानवी जीवनाचे तत्त्व आहे. धर्मग्रंथ हेच खरे जीवनग्रंथ आहेत हे ओळखून गांधीजी सतत शांतीच्या मार्गाने वाटचाल करत राहिले. गांधींचा आणि बुद्धांचा देश म्हणूनच आज जगात भारताची ओळख आहे. आज जागतिक स्तरावर युद्धजन्य स्थितीत गांधीजींच्या सत्य, अहिंसा, प्रेम, शांती आणि विश्वमानवतेच्या विचारांची गरज आहे. सत्याचे सातत्य टिकवणारे सत्याग्रही महात्मा गांधी हेच आज विश्वशांतीचा आणि विश्वकल्याणाचा एकमेव विचार आहेत.”

डॉ. मिलिंद पांडे म्हणाले, “या देशात गांधींच्याच विचारांची गरज आहे. एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठात गांधीजींचे विचार अभ्यासक्रमात शिकवले जातात. वर्ल्ड पार्लमेंटच्या माध्यमातून हे विचार सर्वांपर्यंत पोहोचवत राहू. तसेच डॉ. एस. एन. पठाण म्हणाले, “हिंदू-मुस्लिम भाईचारा देणारी ही व्यक्तिमत्त्वे होती. सर्वजण एकाच ईश्वराची लेकरे आहेत. नव्या पिढीला महात्मा गांधी सांगायला हवेत. तर विष्णू भिसे म्हणाले, “गीतेचा सिद्धांत अध्यात्माच्या माध्यमातून गांधीजींनी कृतीत उतरवला.  Gandhi Jayanti Puneया देशात सत्य, अहिंसा आणि नैतिकतेचा पाया घातला. जगातील बलाढ्य देशही आज गांधीजींचे अनुयायी होऊ लागले आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद पात्रे यांनी केले. डॉ. भागवत बिऱ्हाडी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. महेश थोरवे यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×