जेष्ठाला साडेपाच लाखांचा गंडा
marathinews24.com
पुणे – Crypto Investment Fraud : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाला तब्बल ५ लाख ४३ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना जानेवारी ते फेबु्रवारी २०२६ कालावधीत कोथरुडमध्ये घडली आहे. याप्रकरणी ६६ वर्षीय नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारक, बँक खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील ३ हजार ६०० कोटींच्या ड्रग्ज तस्करीतील दोघांना उच्च न्यायालयाचा जामीन – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जेष्ठ नागरिक असून, कोथरुड परिसरात राहायला आहेत. २९ जानेवारीला सायबर चोरट्यांनी त्यांना एका व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करुन घेतले. त्यानंतर गु्रपमध्ये लिंक पाठवून ऑनलाईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास होणार्या नफ्यावर ३० टक्के कमीशन देण्याचे आमिष दाखवले. सायबर चोरट्यांनी जेष्ठाचा विश्वास संपादित करुन त्यांना गुंतवणूकीला भाग पाडले. (Crypto Investment Fraud) तब्बल साडेपाच लाख रुपये गुंतवणूक करूनही त्यांना कमीशन मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने अलंकार पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक उल्हास कदम तपास करीत आहेत.’
शेअरमधील गुंतवणूक पडली ५ लाखांना
शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल ५ लाख ४१ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२६ कालावधीत कोंढव्यात घडली आहे. याप्रकरणी ४९ वर्षीय नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँक खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष चौधरी तपास करीत आहेत.






















