कॅम्प परिसरातील घटना
marathinews24.com
पुणे – Car Break-in Theft : पे अॅड पार्कमध्ये उभी केलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी महिलेच्या पर्समधील ५ हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून १ लाख ७९ हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना ६ ऑक्टोबरला सकाळी सात ते सव्वा आठच्या सुमारास कॅम्पमधील ईस्ट स्ट्रीटवर हॉटेल मंगल विहार जवळ घडली आहे. याप्रकरणी वानवडीत राहणार्या ५२ वर्षीय महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रिप्टो करन्सीवर ३० टक्क्यांचा परतावा महागात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वानवडीत राहायला असून, ६ ऑक्टोबरला सकाळी सातच्या सुमारास कॅम्प परिसरात आल्या होत्या. Car Break-in Theft त्यांनी ईस्ट स्ट्रिटवर असलेल्या पे अॅड पार्क ठिकाणी मोटार पार्क केली. कामासाठी महिला दुसर्या ठिकाणी गेल्या असता, चोरट्यांनी गाडीची काच फोडली. गाडीतील पर्समधून ५ हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून १ लाख ७९ हजारांचा ऐवज चोरुन नेला. काम संपल्यानंतर महिला पुन्हा गाडीजवळ आल्या असता, त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी लष्कर पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अमलदार जाधव तपास करीत आहेत.






















