Breking News
Constitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्ला

Daund Drought Panchnama : नानगाव येथे खरीप हंगाम दुष्काळ पंचनामा बाबत जनजागृती

Daund Drought Panchnama

शेतकऱ्यांना पंचनामा अर्ज करण्याचे आवाहन; पीएम किसान व महिला शेतकरी प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन

marathinews24.com

पुणे – Daund Drought Panchnama : खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यात १०४ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून शेतकऱ्यांनी पिकांचा पंचनामा करण्यासाठी अर्ज करावेत, यासाठी नानगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रचार-प्रसिद्धी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ग्राम महसूल अधिकारी नीलिमा बोकडे, ग्रामपंचायत अधिकारी नानगाव, सहाय्यक कृषी अधिकारी स्नेहल शिंदे तसेच परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठातर्फे प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ प्रदान – सविस्तर बातमी 

यावेळी खरीप हंगाम दुष्काळ पंचनामा, पीएम किसान योजना आणि महिला शेतकरी प्रमाणपत्र या महत्त्वपूर्ण विषयांवर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. दुष्काळ पंचनाम्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता, संबंधित प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबी तसेच शेतकऱ्यांनी घ्यावयाची दक्षता याबाबत माहिती देण्यात आली. तसेच पीएम किसान योजनेचा लाभ, (Daund Drought Panchnama) महिला शेतकरी प्रमाणपत्राचे महत्त्व आणि संबंधित शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी यांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली.

शासकीय योजनांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, पात्र शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेता यावा आणि दुष्काळ पंचनामा प्रक्रियेबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हे मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून आवश्यक मार्गदर्शन केले. संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×