Breking News
Constitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्ला

Mahalaxmi Temple Decoration : श्री महालक्ष्मी मंदिरातील ‘शृंगार’ या संकल्पनेवरील सजावट व विद्युतरोषणाईचे उद्घाटन

Mahalaxmi Temple Decoration : श्री महालक्ष्मी मंदिरातील 'शृंगार' या संकल्पनेवरील सजावट व विद्युतरोषणाईचे उद्घाटन

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची उपस्थिती

marathinews24.com

पुणे – Mahalaxmi Temple Decoration : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवात मंदिरामध्ये साकारलेल्या ‘शृंगार’ संकल्पनेवर आधारित भव्य सजावट व विद्युत रोषणाईचे उद्घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते झाले. मंदिराचे भव्य प्रवेशद्वार देखील या संकल्पनेवर साकारले असून ते पाहण्याकरिता देवी भक्तांनी मोठी गर्दी केली.

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, नवरात्रोत्सव, शृंगार सजावट, विद्युत रोषणाई, अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, अष्टलक्ष्मी मिरवणूक, Mahalaxmi Temple Decoration, जिवंत देखावा, पुणे नवरात्रोत्सव, Mahalaxmi Temple Decoration, Mahalaxmi Temple Pune, Navratri Festival, Amitesh Kumar, Ashtalakshmi Procession, Pune Events
Mahalaxmi Temple Decoration

घोडेगाव येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात ‘खुले ग्रंथालय व पुस्तक परिचय’ उपक्रम – सविस्तर बातमी 

यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते. मंदिरासह परिसरात साकारण्यात आलेली विद्युत रोषणाई देखील भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.

यंदाच्या नवरात्रोत्सवात ‘शृंगार’ या संकल्पनेवर आधारित सजावट मंदिरामध्ये व भव्य प्रवेशद्वारावर करण्यात आली आहे. (Mahalaxmi Temple Decoration) यामध्ये मंगळसूत्र, जोडवी, हिरवा चुडा, नथ, कोल्हापुरी साज, ठुशी, तन्मणी, पैंजण, पाटल्या, मोहनमाळ, बोरमाळ यांसह विविध प्रकारचे दागिने आणि सौभाग्यलंकार यांच्या सुरेख प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. तसेच मंदिरामध्ये विविध खांबावर देखील या प्रतिकृती पाहायला मिळतात.त्यामुळे ही सजावट देवीभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

यंदाचे वैशिष्ट्य : अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक, जिवंत देखावा

मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. तसेच ललिता पंचमीला गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता कन्यापूजन कार्यक्रम आणि शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी गाथा शिवशंभूंची हा जिवंत देखावा ही यंदाच्या उत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा, समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा सार्वजनिक नवरात्रोत्सव महालक्ष्मी मंदिरात दर वर्षीप्रमाणे यंदाही साजरा होत आहे. तरी देवीभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×