Breking News
Constitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्ला

Pune Navratri Festival : पुणे नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत करा

Pune Navratri Festival

दुष्काळग्रस्तांसाठी १० लाख रुपयांच्या मदतीची मंत्री उदय सामंत याची घोषणा; सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – Pune Navratri Festival : नवरात्रोत्सव हा केवळ सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव न राहता त्याला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली पाहिजे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी पुणे नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून निधी उभारावा, असे आवाहन राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी केली . यावेळी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांसाठी स्वतः १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली.

श्री महालक्ष्मी मंदिरातील ‘शृंगार’ या संकल्पनेवरील सजावट व विद्युतरोषणाईचे उद्घाटन –  सविस्तर बातमी 

पुणे नवरात्रोत्सवाच्या 32व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत करणे ही समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून एकत्रित निधी उभारून तो मुख्यमंत्री सहायता निधीकडे सुपूर्द करण्याचा संकल्प करावा, असे त्यांनी सांगितले.

दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करताना शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला जातो. Pune Navratri Festival त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही संकटग्रस्त नागरिकांना मदत करता येऊ शकते. उत्सव केवळ आनंद साजरा करण्यापुरते मर्यादित न राहता त्यातून समाजसेवेचा संदेश दिला गेला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मराठी भाषेच्या जागतिक प्रसारासाठी प्रयत्न

मराठी भाषा सातासमुद्रापार पोहोचावी आणि तिला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मराठी भाषेचा जागतिक स्तरावर गौरव वाढविण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

उद्योग, सेवा आणि गुंतवणूक या क्षेत्रांतील संधींचा उपयोग महाराष्ट्राच्या विकासासाठी तसेच मराठी उद्योजकांना जागतिक स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी केला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे नवरात्रोत्सवाच्या 32 व्या वर्षानिमित्त दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी निधी उभारण्याचे आवाहन करत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×