Breking News
Constitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्ला

Open Library Initiative : घोडेगाव येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात ‘खुले ग्रंथालय व पुस्तक परिचय’ उपक्रम

Open Library Initiative

वाचनाची आवड जोपासण्यासाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत उपक्रम

marathinews24.com

पुणे – Open Library Initiative : सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत घोडेगाव येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात १० ऑक्टोबर रोजी ‘खुले ग्रंथालय व पुस्तक परिचय’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ज्ञानात भर घालणे आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हा उद्देश ठेवण्यात आला.

शेतकऱ्यांच्या उसाला भाव आणि अनुदानित संस्थांमध्ये एमपीएससी द्वारे कर्मचारी भरती यासाठी करावे रोहित पवारांनी आंदोलन – सविस्तर बातमी 

वाचनामुळे ज्ञानाची व्याप्ती वाढते, विचारांना दिशा मिळते आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. या उद्देशाने आयोजित उपक्रमात विद्यार्थिनींना विविध विषयांवरील पुस्तकांची ओळख करून देण्यात आली. विद्यार्थिनींनी आपल्या आवडीची पुस्तके निवडून त्यांचे वाचन केले. (Open Library Initiative) तसेच पुस्तकांमधील महत्त्वाचे विचार, माहिती आणि आशय इतर विद्यार्थिनींसमोर मांडण्याची संधी त्यांना देण्यात आली.

या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना पुस्तकांशी संवाद साधण्याबरोबरच वाचनातून मिळालेले ज्ञान व्यक्त करण्याची संधी मिळाली. ग्रंथालय मंत्री यांच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी ग्रंथालयातील पुस्तके वाचनासाठी घेतली. यावेळी वसतिगृहाच्या गृहपाल रेणुका जाधव, कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विद्यार्थिनींमध्ये वाचनसंस्कृती रुजविणे, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विकसित करणे आणि ज्ञानाधिष्ठित व्यक्तिमत्त्व घडविणे यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×