Breking News
Pune Metro Traffic Changes : स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी वाहतुकीत बदलBaner Robbery Case Pune : बाणेर परिसरात लूटमार करणारे गजाआडPune Illegal Pistol Seizure: सिंहगड रस्ता पोलिसांकडून सराइतांना बेड्या; पिस्तूल जप्तPune Lokmanya Festival : पुणे लोकमान्य फेस्टिवलच्यावतीने ३० फुटांच्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन; अनिष्ट प्रवृत्तींच्या अंताचा संदेशPune Bibwewadi Robbery Case : तरुणाला मारहाण करुन लुटणारे गजाआडPune Senior Citizen Pension Fraud : ज्येष्ठ महिलेची ७ लाखांची फसवणूकPune Post Office Theft Attempt : रास्ता पेठेतील टपाल कार्यालयात चोरीचा प्रयत्नPune Mahalakshmi Temple Gold Saree : सुवर्णवस्त्रांनी सजली सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीMakarand Anaspure : विद्यार्थीपण आहे तोपर्यंतच जगण्याला अर्थ- मकरंद अनासपुरेMLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

Pune Lokmanya Festival : पुणे लोकमान्य फेस्टिवलच्यावतीने ३० फुटांच्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन; अनिष्ट प्रवृत्तींच्या अंताचा संदेश

Pune Lokmanya Festival

अन्नपदार्थांमध्ये भेसळ, पाणीटंचाई, वाहतूक कोंडी आणि दुष्काळाच्या समस्यांचे प्रतीकात्मक दहन

marathinews24.com

पुणे – Pune Lokmanya Festival : वाईटावर चांगल्याचा विजय आणि अनिष्ट प्रवृत्तींच्या अंताचा संदेश देत पुण्यातील लोकमान्य नगर येथे ३० फुटांच्या भव्य रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रावणदहन सोहळ्याला पुणेकरांनी तसेच बालचमूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यंदा पुणे लोकमान्य फेस्टिवलचे २९ वे वर्ष होते.

सुवर्णवस्त्रांनी सजली सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवी – सविस्तर बातमी  

अन्नपदार्थांमध्ये भेसळ, पाणीटंचाई, वाहतुकीचा बोजवारा, दुष्काळाचा भस्मासुर आणि समाजातील अनिष्ट प्रवृत्ती या समस्यांचे प्रतीकात्मक दहन करून नागरिकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. समाजाला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यावर सकारात्मक उपाययोजना करण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर ३० फुटांच्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. आकाशात झेपावणाऱ्या फटाक्यांची रोषणाई आणि रावणदहनाचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विशेषतः लहान मुलांमध्ये या सोहळ्याबाबत मोठा उत्साह दिसून आला. संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाची माहिती पुणे लोकमान्य फेस्टिवलचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. गणेश सातपुते आणि उत्सवाध्यक्ष नरेश मित्तल यांनी दिली.

“रावणदहन हा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा भाग नसून, (Pune Lokmanya Festival) समाजातील वाईट प्रवृत्तींचा नाश करण्याचा संदेश देणारा उपक्रम आहे. आज पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, दुष्काळ, अन्नभेसळ आणि विविध अनिष्ट प्रवृत्ती या समस्या समाजासमोर उभ्या आहेत. अन्नभेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून, अशा गैरप्रकारांविरोधात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी जनजागृती आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण झाली पाहिजे. पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या माध्यमातून गेली २९ वर्षे सांस्कृतिक परंपरा जपत सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा आणि समाजप्रबोधनाचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

— ॲड. गणेश सातपुते संस्थापक-अध्यक्ष, पुणे लोकमान्य फेस्टिवल

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×