कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील घटना
marathinews24.com
कोल्हापूर : Kolhapur Crime News : नवीन गाडी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणाने चक्क आपल्या चुलत्याच्या घरावरच डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. चुलत्याच्या घरातील सोन्याचे दागिने चोरी करून त्यांची सोनाराकडे विक्री केल्यानंतर संबंधित तरुणाने नवीन महिंद्रा थार खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, कारच्या पूजेसाठी त्याने ज्या चुलत्याच्या घरातून दागिने चोरले त्याच चुलत्याला थारच्या पुजेसाठी बोलवण्यात आले. या विचित्र प्रकारामुळे पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी कोडोली पोलिसांनी पुतण्या समर चव्हाण आणि चोरीचे दागिने खरेदी केल्याचा आरोप असलेल्या सोनार संग्राम मोरे यांना ताब्यात घेतले आहे.
पुण्यात पार्किंगच्या वादातून हाणामारीच्या घटना – सविस्तर बातमी
मिळालेल्या माहितीनुसार, सातवे येथील समर पोपट चव्हाण हा आपल्या कुटुंबीयांसह राहतो. त्याच्या शेजारीच त्याचे चुलते उमेश मारुती चव्हाण यांचे कुटुंब राहते. साधारण महिनाभरापूर्वी उमेश चव्हाण यांच्या घरातून सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे समोर आले. घरातील दागिने गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र, दागिने सापडले नाहीत. विशेष म्हणजे,चोरी झालेल्या दागीन्याजवळ घरातील आजीचे देखील होते परतू त्या दागिन्याची चोरी झाली नाही, तर उमेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीचे दागिनेच चोरीला गेल्याचे आढळले. (Kolhapur Crime News) त्यामुळे चोरीच्या घटनेत जवळच्या व्यक्तीचा सहभाग असावा, असा संशय कुटुंबीयांना आला. दरम्यान, समर चव्हाण याने अचानक नवीन महिंद्रा थार खरेदी केल्याने आणखी संशय बळावला. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हे दागिने गावातील सोनार संग्राम बाबासो मोरे याला विकल्याचा आरोप आहे.
नवीन कार घरी आणल्यानंतर समरने तिच्या पूजेसाठी चुलते उमेश चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना बोलावले. पूजेच्या तयारीदरम्यान चुलत्यांच्या कुटुंबीयांनी दागिने शोधले असता ते गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर उमेश चव्हाण यांनी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पुतण्या आणि सोनार पोलिसांच्या ताब्यात
तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीच्या घटनेचा तपास सुरू केला. समरने अचानक खरेदी केलेली कार आणि त्यासाठी पैशांची व्यवस्था कशी केली, याची चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान समर चव्हाण याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी समर चव्हाण आणि दागिने खरेदी केल्याचा आरोप असलेल्या संग्राम मोरे यांना ताब्यात घेतले.
चोरीचे दागिने आणि संबंधित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोलीस उपअधीक्षक श्रीकांत ठिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोडोली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.




















