Breking News
Maharashtra Drought News : पशुधनासाठी चारा उपलब्धतेसाठी राज्यभर ‘मिशन मुरघास’ मोहीमNasha Mukt Bharat Abhiyaan : नशामुक्त भारत अभियानांतर्गत विभागीय कार्यशाळा संपन्नPune Crime News : पुण्यात विद्यार्थ्यांच्या फ्लॅटमधून ६ लॅपटाॅप चोरीलाMarathi Movie 2026 : गांव तिथं गावकी भाव तिथं भावकी’ प्रेक्षकाच्या भेटीलाAmbiya Bahar Crop Insurance 2026 : आंबिया बहार फळबागांसाठी हवामान धोक्यांपासून संरक्षण; शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी अर्ज करण्याचे आवाहनRana Suryawanshi Attack Case : जवळच्या तीन मित्रांनी दिली सुपारी; हल्ल्यानंतर केला मदतीचा बहाणाMahatma Jyotirao Phule : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्याचे आवाहनKharadi Bypass Robbery Case : पादचारी जेष्ठेच्या अंगावर पाणी उडवून लुटलेLost Mobile Recovery : वाघोली पोलिसांनी तक्रादारांच्या चेहर्‍यावर फुलवले हसूPune Crime News : पुण्यात पार्किंगच्या वादातून हाणामारीच्या घटना

Pune Crime News : पुण्यात विद्यार्थ्यांच्या फ्लॅटमधून ६ लॅपटाॅप चोरीला

Pune Crime News

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : विद्यार्थी राहत असलेल्या दोन सदनिकांमधून चोरट्यांनी सहा लॅपटाॅप चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत महाविद्यालयीन तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जवळच्या तीन मित्रांनी दिली सुपारी; हल्ल्यानंतर केला मदतीचा बहाणा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील रायसोनी महाविद्यालयाजवळ गणेश हाईट्स आणि सदगुरु कृपा अपार्टमेंट आहे. चोरट्यांनी सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधली. दोन सदनिकांमधून सहा लॅपटाॅप चोरुन नेल्याची घटना गुरुवारी (२२ ऑक्टोबर) सकाळी घडली. लॅपटाॅप चोरीला गेल्याच्या प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक रमेश साबळे तपास करत आहेत.

उपाहारगृहसमोर टोळक्याची दहशत

उपाहारगृहासमोर टोळक्याने दहशत माजविल्याची घटना घोरपडी गाव परिसरात घडली. (Pune Crime News ) टोळक्याने उपाहारगृह चालकासह थांबलेल्या नागरिकांना धमकाविले. या प्रकरणी मुंढवा पोलिसांकडून टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका उपाहारगृह मालकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडीतील शिर्के कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बाबू खान केटरर्स हे उपाहारगृह आहे. २१ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास टोळके तेथे आले. उपाहारगृहासमोर थांबलेल्या नागरिकांना धमकावले. या भागात थांबायचे नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर टोळके उपाहारगृहात शिरले. त्यांनी उपाहारृहातील भांडी फेकून दिली. कोयते उगारून दहशत माजविली, उपाहारगृहाच्या मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस कर्मचारी गायकवाड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×