व्यसनमुक्ती, अमली पदार्थांना प्रतिबंध आणि पुनर्वसनावर चर्चा
marathinews2.4.com
पुणे – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने (Nasha Mukt Bharat Abhiyaan) ‘नशामुक्त भारत अभियानांतर्गत’ ‘Reimagining Prevention and Drug Demand Reduction’ या विषयावर विभागीय शिखर परिषद व कार्यशाळा पुणे येथे आयोजित करण्यात आली.
गांव तिथं गावकी भाव तिथं भावकी’ प्रेक्षकाच्या भेटीला – सविस्तर बातमी
या कार्यक्रमास समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे, प्रमुख अतिथी पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते. कार्यशाळेत व्यसनमुक्ती, अमली पदार्थांच्या सेवनास प्रतिबंध, जनजागृती आणि पुनर्वसन याबाबत चर्चा करण्यात आली. विविध विभागांच्या प्रतिनिधींनी उपक्रमांचे सादरीकरण करून व्यसनमुक्तीसाठी विभागीय समन्वय व लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला.























