Breking News
Pune Private Bus Fare : खासगी प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केल्यास कठोर कारवाईPune Soldier Welfare Scheme : माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख २५ हजारांचे वितरणPune MCOCA Action : पुण्यात गोळीबार करुन लुटमार; उत्तर प्रदेशातील दरोडेखाेरांविरुद्ध मोक्का’Pune Fodder Management Plan : पुणे जिल्ह्याचे असे नियोजन ; चारा टंचाईवर होईल मात – विशेष लेखPune Crop Insurance Scheme : पीक व फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवा; व्यापक जनजागृती करा – वैभव तांबेPune MD Drug Seizure : पुण्यात मेफेड्रोन ड्रग्जविरोधात मोठी कारवाईPune House Burglary News : पुण्यात तीन ठिकाणी घरफोड्या; दागिने, रोकड लंपासPune Cyber Crime News : रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्याच्या बहाण्याने दोघांना १७ लाखांचा गंडाSkill Development for Youth : कौशल्यसंपन्न युवा पिढी घडविणे हीच विकसित देशाची खरी गुरुकिल्ली- डॉ. विजय भटकरMaharashtra Fodder Shortage : चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभाग सज्ज

Pune MD Drug Seizure : पुण्यात मेफेड्रोन ड्रग्जविरोधात मोठी कारवाई

Pune MD Drug Seizure

१२९ ग्रॅम एमडीसह ३ पिस्तूल, दुचाकी जप्त

marathinews24.com

पुणे – Pune MD Drug Seizure : शहरात अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. लोणीकंद पोलिसांनी माहितीच्या आधारे कारवाई करून ७ जणांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल १२८.३ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ, तीन पिस्तुले, जिवंत काडतुसे जप्त केले. आरोपीला पकडल्यानंतर पुढील तपासात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

पुण्यात तीन ठिकाणी घरफोड्या; दागिने, रोकड लंपास – सविस्तर बातमी 

प्रतीक उर्फ सोन्या दत्तात्रेय होले (वय ३५, रा. लोणीकंद) विशाल शिवाजी माकर (वय २६, रा. शिरूर) सोमनाथ संजय गोरे (वय २४, रा. शिरूर) विशाल उर्फ दादा रामदास कोलते (वय ३३, रा. बकोरी) राजूराम उमेदराम चौधरी (वय ३४, रा. मु. पो . रांजणगाव, शिरूर) वैभव बाळू खेडकर (वय २८, रा. शिरूर) शिवम प्रश्नांत देडगे (वय २१, रा. शिरूर) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

पुणे पोलिसांनी अमली पदार्थांची विक्री, साठवणूक आणि वितरण करणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे लोणीकंद पोलीस हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार शुभम चिनके आणि सुधीर शिवले यांना गोपनीय माहिती मिळाली. (Pune MD Drug Seizure) कटकेवाडी फाटा या ठिकाणी एक जण ड्रग्स विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. संशयित प्रतीक उर्फ सोन्या होले हा दिसताच त्याला पकडले त्यावेळी त्याच्याकडे २० ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ, एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुस जप्त केली.

तपासात विशाल आणि सोमनाथ गोरे यांची नावे समोर आली. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले, त्यावेळी त्यांच्याकडून दोन देशी बनावटी पिस्तुले आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली. अधिक तपासात विशाल कोलते राजू राम चौधरी, वैभव खेडकर आणि शिवम देडगे यांना पकडण्यात आले. चौघांकडून १०८.४ एमडी हा अमली पदार्थ जप्त केला. कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन हा अंमली पदार्थ १२८.३ ग्रॅम एमडीसह, ३ पिस्तूल पाच काडतुसे आणि वाहने जप्त केले आहेत. अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीतील इतर संबंधित व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे.

अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले

अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न सुरू असून, अशा अवैध धंद्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अंमली पदार्थविरोधी मोहिमेला आणखी गती मिळाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×