Breking News
Pune Farmer Diwali Assistance 2026 : पुणे जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार ५४२ शेतकऱ्यांना दिवाळी अग्रीम मदतDrought Relief 2026 Maharashtra : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ४ हजार ३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत- मंत्री मकरंद जाधव पाटीलPune Private Bus Fare : खासगी प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केल्यास कठोर कारवाईPune Soldier Welfare Scheme : माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख २५ हजारांचे वितरणPune MCOCA Action : पुण्यात गोळीबार करुन लुटमार; उत्तर प्रदेशातील दरोडेखाेरांविरुद्ध मोक्का’Pune Fodder Management Plan : पुणे जिल्ह्याचे असे नियोजन ; चारा टंचाईवर होईल मात – विशेष लेखPune Crop Insurance Scheme : पीक व फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवा; व्यापक जनजागृती करा – वैभव तांबेPune MD Drug Seizure : पुण्यात मेफेड्रोन ड्रग्जविरोधात मोठी कारवाईPune House Burglary News : पुण्यात तीन ठिकाणी घरफोड्या; दागिने, रोकड लंपासPune Cyber Crime News : रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्याच्या बहाण्याने दोघांना १७ लाखांचा गंडा

Pune MCOCA Action : पुण्यात गोळीबार करुन लुटमार; उत्तर प्रदेशातील दरोडेखाेरांविरुद्ध मोक्का’

Pune MCOCA Action

रखवालदारानेच रचला लुटमारीचा कट; गोळीबार प्रकरणातील तिघांवर मोक्का

marathinews24.com

पुणे – Pune MCOCA Action : मोटार चालक व्यावसायिकावर गोळीबार करुन ११ लाखांचे दागिने लुटणाऱ्या उत्तर प्रदेशातील दरोडेखोरांच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. अविनाश कृष्णचंद्र त्रिपाठी (वय ४३, सध्या रा. क्रिस्टल सोसायटी, बकोरी, अहिल्यानगर रस्ता, मूळ रा. तिलकनगर, जि. बाराबंकी, उत्तर प्रदेश), मोहम्मद शोएब वसीम खान सिद्दीकी (वय ३६, रा. आझादनगर, जि. बाराबंकी, उत्तर प्रदेश ), सुरेंद्र रामचंद्र पाल (वय ३२, रा. राभिलवाल हैदरगा, जि. बाराबंकी, उत्तर प्रदेश) अशी कारवाई केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. याबाबत व्यावसायिकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात मेफेड्रोन ड्रग्जविरोधात मोठी कारवाई – सविस्तर बातमी 

आरोपी त्रिपाठी हा नगर रस्त्यावरील सोसायटीत रखवालदार म्हणून काम करत होता. तक्रारदार व्यावसायिक यांचे कार्यालय नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरात आहे. ५ ऑगस्टला ते रात्री साडेआठच्या सुमारास नगर रस्ता परिसरातील शिरसवाडी गावातून निघाले होते. Pune MCOCA Action त्यावेळी त्रिपाठीसह साथीदार सिद्दीकी, पाल यांनी मोटार अडविली. व्यावसायिकावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करुन त्यांच्या गळ्यातील २२ तोळ्यांच्या दोन सोनसाखळी हिसकावून नेल्या. गोळीबारात व्यावसायिक गंभीर जखमी झाला होता. प्रकरणाचा लोणीकंद पोलिसांनी तपास करुन पसार झालेल्या आरोपींना अटक केली.

त्रिपाठी हा सराईत आहे. त्याच्याविरुद्ध उत्तर प्रदेश, शिक्रापूर, पुण्यातील कोरेगाव पार्क, हडपसर पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, खंडणीसाठी अपहरण असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती तपासात मिळाली होती. व्यावासयिकावर गोळीबार करुन त्याला लुटण्याचा कट साथीदारांशी संगनमत करुन त्रिपाठीने रचल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्रिपाठीसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये प्रस्ताव लोणीकंद पोलिसांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर केला.

पोलीस आयुक्तांनी त्रिपाठीसह साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाईचे आदेश नुकतेच दिले. ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त अबिनाशकुमार, सहायक आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे, पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर, सहायक निरीक्षक देवदास शेवाळे, गजानन कागणे, गणेश दळवी, शुभम सातव, विठ्ठल केदारी, ज्योती कुटे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×