Breking News
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता तालुकास्तरावरहीSaudamini Diwali Magazine : महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्यिक अभिव्यक्तीला ‘सौदामिनी’तून व्यासपीठPune Farmer Diwali Assistance 2026 : पुणे जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार ५४२ शेतकऱ्यांना दिवाळी अग्रीम मदतDrought Relief 2026 Maharashtra : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ४ हजार ३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत- मंत्री मकरंद जाधव पाटीलPune Private Bus Fare : खासगी प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केल्यास कठोर कारवाईPune Soldier Welfare Scheme : माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख २५ हजारांचे वितरणPune MCOCA Action : पुण्यात गोळीबार करुन लुटमार; उत्तर प्रदेशातील दरोडेखाेरांविरुद्ध मोक्का’Pune Fodder Management Plan : पुणे जिल्ह्याचे असे नियोजन ; चारा टंचाईवर होईल मात – विशेष लेखPune Crop Insurance Scheme : पीक व फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवा; व्यापक जनजागृती करा – वैभव तांबेPune MD Drug Seizure : पुण्यात मेफेड्रोन ड्रग्जविरोधात मोठी कारवाई

Saudamini Diwali Magazine : महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्यिक अभिव्यक्तीला ‘सौदामिनी’तून व्यासपीठ

Saudamini Diwali Magazine

देशातील पहिला अभिनव उपक्रम; महिलांना प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करावे लागते – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

marathinews24.com

पुणे – महिलांना नेतृत्वाच्या संधी सहज मिळत नाहीत. संधी मिळाली तरी प्रत्येक वेळी आपले कर्तृत्व आणि क्षमता सिद्ध करावी लागते. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी महिलांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, असे प्रतिपादन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले. सरहद संस्थेच्या वतीने महिला शासकीय अधिकाऱ्यांसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या ‘सौदामिनी’ या विशेष दिवाळी अंकाचे प्रकाशन आज राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते पुणे येथे झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

पुणे जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार ५४२ शेतकऱ्यांना दिवाळी अग्रीम मदत – सविस्तर बातमी 

महिला नेतृत्वाच्या उदाहरणांचा उल्लेख करताना मिसाळ यांनी भारतीय लष्करातील लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांच्या कार्याचा विशेष गौरव केला. विविध क्षेत्रांत महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर नेतृत्वाची शिखरे गाठली आहेत. अशा महिलांचे अनुभव, विचार आणि साहित्यिक अभिव्यक्तीला ‘सौदामिनी’च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा सरहद संस्थेचा प्रयत्न महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्यिक अभिरुचीला प्रोत्साहन देणे, प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्यांच्यातील लेखिका, कवयित्री आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला अभिव्यक्तीची संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. देशात प्रथमच महिला शासकीय अधिकाऱ्यांसाठी अशा स्वरूपाचा विशेष दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आला आहे.

या अंकामध्ये प्रशासनातील महिलांचे अनुभव, सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, साहित्यिक लेखन, स्त्रीजीवनाचे विविध पैलू आणि वैचारिक मांडणी यांचा समावेश करण्यात आला आहे. महिला अधिकारी म्हणून प्रशासकीय कार्यासोबतच त्यांच्यातील साहित्यिक प्रतिभा, स्वतंत्र विचारशक्ती आणि सामाजिक जाणिवांचा परिचय समाजाला व्हावा, हा या उपक्रमामागील व्यापक हेतू आहे.

या विशेषांकाच्या संपादकपदाची जबाबदारी निवृत्त माहिती संचालक श्रद्धा बेलसरे-खारकर यांनी सांभाळली असून, सहसंपादक म्हणून सरहदचे समन्वयक लेशपाल जवळगे यांनी काम पाहिले आहे. यावेळी सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, समन्वयक डॉ. शैलेश पगारिया, डॉ. संगीता शिंदे, कविता वानखेडे, मनीषा वाडेकर, गीता खोत आणि मयूर मसुरकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×