Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

तरुणाच्या डोक्यात दगड मारून खून करणारा लातूरमधून अटकेत

पुणे गुन्हे शाखेची कारवाई

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने लातूरमधून अटक केली. कात्रज बाह्यवळण मार्गावरील हांडेवाडी स्मशानभूमी परिसरात ही घटना घडली होती. आसिफ युुनूस शेख (वय २५, रा. गल्ली क्रमांक पाच, सय्यदनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हनीफ मुसा शेख (वय ३०, रा. कृष्णानगर, महमदवाडी, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. १० मे रोजी हनीफ शेख हा हांडेवाडी-होळकरवाडी स्मशानभूमीजवळील मोकळ्या जागेत मृतावस्थेत सापडला होता.

ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा केला मेसेज, आरोपी गजाआड – सविस्तर बातमी

डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत हनीफच्या भावाने फिर्याद दिली होती. हनीफच्या खुनामागचे कारण समजू शकले नव्हते. या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या युनिट पाच आणि सहाकडून समांतर तपास करण्यात येत होता. पोलिसांनी बाह्यवळण मार्ग परिसरातील ५० ते ६० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. हनीफ आणि आसिफ यांच्यात वाद झाले होते. वादातून हनीफने त्याला दोन ते तीन वेळा मारहाण केली होती.

आसिफ त्याच्यावर चिडून होता. १० मे रोजी दोघे जण हांडेवाडी स्मशानभूमीजवळ गेले होते. तेथे हनीफने दारु प्याली. दारुच्या नशेत असलेल्या हनीफने आसिफशी वाद घालण्यास सुरूवात केली. दोघांमध्ये झटापट झाली. आसिफने हनीफच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर आसिफ लातूरला पसार झाला. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा माग काढून लातूरमधून अटक केली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, सहायक फौजदार राजस शेख, बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, तानाजी देशमुख, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×