Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

कात्रजमध्ये रस्ता ओलांडणार्‍या पादचार्‍याला उडविले, टेम्पो चालक पसार

मद्यधुंद कार चालकाने डिलिव्हरी बॉयला चिरडले

अज्ञात टेम्पो चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे– भरधाव टेम्पो चालकाने रस्ता ओलांडणार्‍या तरूणाला धडक दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात १३ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कात्रज परिसरातील सृष्टी लॉजसमोर घडला आहे. याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगा प्रसाद (वय ३९ रा. आंबेगाव बुद्रूक) असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

मोबाईलमध्ये व्हॉइस रेकॉर्ड करून ठेवला अन पत्नीचा गळा घोटून केली आत्महत्या – सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा प्रसाद एकाठिकाणी काम आटोपून रस्त्याने घरी जात होता. १३ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कात्रज परिसरातील सृष्टी लॉजसमोर तो रस्ता ओलांडत होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या टेम्पो चालकाने त्याला धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या गंगा प्रसाद याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातानंतर जखमी गंगा प्रसादला मदत न करता पसार झाला. त्याच्या शोधासाठी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असून, वाहन क्रमांकानुसार लवकरच आरोपी चालकाला ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×