लोणीकंद पोलिसांकडून आजे सासऱ्यासह सासऱ्याला अटक
marathinews24.com
पुणे – दुचाकीच्या अपघातात जावयाचा मृत्यु झाल्याचा बनाव लोणीकंद पोलिसांनी आणला. या प्रकरणी पोलिसांनी आजे सासऱ्यासह सासऱ्याला अटक केली. आजे सासरे रहीम मोहम्मद शेख (वय ६५), आणि सासरे अमर रहीम शेख (वय ४५, दोघे रा. चौफुला वस्ती, कोलवडी, ता. हवेली) यांना अटक करण्यात आली. सुलतान सादीक शेख (वय २४, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे खुन झालेल्या जावयाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ साबीर सादीक शेख (वय २६) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़.
पुण्यात लक्ष्मीपूजनानिमित्त चोरट्यांचा उच्छाद – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलतान शेख हा रिक्षाचालक होता. त्याचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्याचा पत्नीबरोबर वाद झाला होता. त्यानंतर सासू आणि सासरे हे शेख याच्या पत्नीला घेऊन ९ नोव्हेंबर रोजी माहेरी गेले होते. त्यानंतर सुलतान शेख हा तिचा शोध घेत रात्री चौफुला वस्तीतील सासरी गेला होता. त्या वेळी आजे रहीम शेख, सासरे अमर यांनी सुलतान याला दांडक्याने मारहाण केली. त्यामुळे सुलतानचा मृत्यु झाला. त्यानंतर त्यांनी सुलतानला रुग्णालयात नेले. वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी दुचाकीवरुन सुलतान पडल्याने जखमी झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांना सांगितल.
‘सुलतानचा अपघातात मृत्यु झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याला मारहाण केल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा त्यांच्या घरासमोरील अपघात झाल्याचे दिसून आले नाही. तेथे दुचाकी पडलेली नव्हती, तसेच अपघात झाल्याचे दिसून आले नाही. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर आरोपींनी मारहाण केल्याची कबुली दिली. आरोपींनी ज्या लाकडी दांडक्याने जावयाला मारहाण केली होती. ते लाकडी दांडके जप्त करण्यात आले आहे’, अशी माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे यांनी दिली. पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.




















