Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Mukhyamantri Matsya Sampada Yojana : मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजना व मासेमारी परवाना सेवा आता पूर्णपणे ऑनलाईन

Mukhyamantri Matsya Sampada Yojana

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेला गती; महाडीबीटी २.० पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू, अनुदान थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार

marathinews24.com

पुणे – Mukhyamantri Matsya Sampada Yojana : मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास करणे, मत्स्यव्यवसायिकांचे उत्पन्न वाढविणे, रोजगार व उद्योजकतेला चालना देणे तसेच शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत २४ लाभार्थीभिमुख योजना व मासेमारी परवाना सेवांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राज्यस्तरीय व जिल्हा वार्षिक योजनांचे एकत्रिकरण करून “मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना” राज्यात राबविण्यास ९ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत एकूण २८ योजनांना मान्यता असून, त्यापैकी २४ लाभार्थीभिमुख योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आदिवासींचा स्वाभिमान वीर बाबुराव शेडमाके – डॉ.अशोक उईके, आदिवासी विकास, मंत्री – सविस्तर बातमी 

तसेच मच्छिमारांना मासेमारी परवाना वितरण ही सेवाही GPR अंतर्गत पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २८ ऑक्टोबर २०२६ रोजी महाडीबीटी २.० (https://mahadbt2.maharashtra.gov.in/) या पोर्टलवर विभागाच्या २४ योजनांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे.

Mukhyamantri Matsya Sampada Yojana  या सुधारणांमुळे अर्ज प्रक्रिया सुलभ होणार असून, ऑफलाईन कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. विविध शासकीय डेटाबेसमधून आवश्यक माहितीची स्वयंचलित पडताळणी होणार असून, मंजूर अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच सेवांची प्रमाणपत्रे ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.

राज्यातील सर्व मत्स्यशेतकरी, मच्छिमार, मत्स्यव्यवसायिक व मच्छिमार संस्थांनी महाडीबीटी २.० पोर्टलवर आधार क्रमांकाच्या आधारे महाआयडी तयार करून योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत व योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.

जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, पुणे येथे “मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सहाय्यता कक्ष” स्थापन करण्यात आला असून महाआयडी तयार करणे किंवा ऑनलाईन अर्ज करताना अडचणी आल्यास संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यता कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अर्चना शिंदे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×