Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune Gold Chain Snatching : तरुणीची तीन लाखांची सोनसाखळी हिसकावली

Pune Gold Chain Snatching

डेक्कन जिमखाना परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – Pune Gold Chain Snatching : शहरातील डेक्कन जिमखाना भागात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीच्या गळ्यातील ३ लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गु्नहा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी आणि तिचा चुलत भाऊ हे भाऊबीजेच्या दिवशी (११ नोव्हेंबर) रात्री सव्वा अकराच्या सुमारास दुचाकीवरुन डेक्कन जिमखाना भागातून निघाले होते. आघारकर संस्थेजवळील वि. स. खांडेकर चौकात दुचाकीस्वार चोरट्यांनी दुचाकीवरील तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करत आहेत.

शेअर ट्रेडिंगमधून परताव्याचे आमिष; २५ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

फटाक्यामुळे नदीपात्रात टेम्पोला आग

पेटता फटका पडल्याने टेम्पोला आग लागल्याची घटना नदीपात्रातील रस्त्यावर घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. भिडे पुलाजवळ नदीपात्रातील रस्त्यावर टेम्पोला लावण्यात आला होता. मध्यरात्री दोनच्या सुमारास टेम्पोला आग लागल्याची माहिती अग्निशामन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आगीत टेम्पोच्या दर्शनी भाग, तसेच टपाचे नुकसान झाले. पेटता फटका पडल्याने आग लागली, अशी माहिती अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. दिवाळीत पुणे शहर परिसरात फटाक्यांमुळे ९६ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×