कोथरूड पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा
marathinews24.com
पुणे – Share Trading Scam Pune : कंपनीत संचालकपद देण्यासह शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या मुलाची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुंतवणुकीच्या रकमेवर परतावा न मिळाल्याने अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पेन्शन कार्डच्या जाहिरातीद्वारे ४ लाख ८५ हजारांची फसवणूक – सविस्तर बातमी
राम रामचंद्र भाटले आणि रोशनी झुनझुनवाला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत श्रीकांत भागवताराव नवले (वय ६३) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २०२४ पासून ११ नोव्हेंबर २०२६ या दरम्यानच्या काळात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भाटले याने फिर्यादी नवले यांच्या मुलाचा विश्वास संपादन करून त्याला कंपनीत संचालकपद देण्याचे आश्वासन दिले. तसेच शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास त्यातून चांगला आर्थिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. Share Trading Scam Pune या आश्वासनांवर विश्वास ठेवून नवले आणि त्यांच्या मुलाने आरोपींकडे २५ लाख रुपये दिले. मात्र, ठरल्याप्रमाणे परतावा मिळाला नाही. तसेच गुंतवलेली रक्कमही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नवले यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून २२ लाखांची फसवणूक
वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरिकाकडून २२ लाख रुपये ऑनलाइन हस्तांतरित करून घेतल्याची तक्रार विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. डिजिटल अरेस्टची भीती दाखवून रक्कम मागितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारकावर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चंद्रराम बालण्णा कुतापेल्ली (वय ७१, रा. फ्लॅट ए/१, दर्शन पार्क को-ऑप. सोसायटी, मोहनवाडी, आळंदी रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ ते १५ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन संपर्क साधून आरोपीने विश्वास संपादन केला. सिमकार्डाचा गैरवापर झाल्याचे सांगून सिक्युरिटी डिपॉझिट आणि डिजिटल पडताळणीच्या नावाखाली पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले. त्यानुसार २२ लाख रुपये घेतले.




















