Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune Cat Theft Case : पर्शियन मांजरीची चोरी करून विक्री; ५ जणांवर गुन्हा दाखल

Pune Cat Theft Case

कोरेगाव पार्कमधील बंगल्यातून २५ हजारांची मांजर चोरली; परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघड

marathinews24.com

पुणे – Pune Cat Theft Case शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील बंगल्यातून २५ हजार रुपये किमतीची पर्शियन हिमालयन जातीची मांजर चोरून तिची परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाच जणांवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उमेश दिगंबर भोसले (वय ५५, रा. हाऊस नं. २, मोलेदिना रोड, कॅम्प) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार फराह मेमन, विराज पवार, मुबिना मेमन, अमरदीप आणि संदीप अहिवळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३१ ऑगस्टला रात्री दहाच्या सुमारास कोरेगाव पार्क येथील लेन क्रमांक तीन मध्ये घडली.

‘टॉनिक’च्या नावाने गुगलवर बनावट वेबसाइट – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार उमेश भोसले हे कोरेगाव पार्कमध्ये राहायला असून, आरोपी फराह मेमन आणि विराज पवार यांनी त्यांची विदेशी जातीची मांजर चोरली. त्यानंतर त्यांनी ही मांजर संदीप अहिवळे याला विकली. (Pune Cat Theft Case) अहिवळे यानेही पुढे दोन अनोळखी व्यक्तींना मांजरीची विक्री केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर १२ नोव्हेंबरला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कोरेगाव पार्क पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×