काळेपडळ पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – Pune Police Crime News : शहरातील हडपसर परिसरासह विविध भागांत गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगार गणेश बबन लोंढे (वय २५, रा. पांढरे मळा, हडपसर, पुणे) याच्यावर मोक्का नुसार कारवाई केली आहे. काळेपडळ पोलिसांनी महाराष्ट्र संघटित धोकादायक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला होता. कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पोलिसांनी कडक इशारा दिला आहे.
फेरफार नोंदींसाठी २० हजारांची लाच मागितली – सविस्तर बातमी
गणेश लोंढे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारामारी, दहशत निर्माण करणे, बाललैंगिक अत्याचार तसेच अवैध शस्त्रांशी संबंधित विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. हडपसर, कोंढवा, वानवडी आणि काळेपडळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत त्याच्याविरुद्ध सहा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. Pune Police Crime News ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली. कारवाईत काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर, पोलीस निरीक्षक आण्णासो बाबर, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, उपनिरीक्षक अनिल निंबाळकर, उपनिरीक्षक संदीप राऊत यांनी केली.
तडीपार जेरबंद; लोणीकंद पोलिसांची कारवाई
पुणे जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार केलेल्या एकास कोलवडी येथून जेरबंद केले आहे. याप्रकरणी त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर राजेंद्र भालसिंग (वय ३२, रा. कोलवडी) असे पोलिसांनी जेरबंद केलेल्याचे नाव आहे. त्यास सप्टेंबर २०२६ पासून एक वर्षासाठी तडीपार केले असताना तो त्याच्या घरी आल्याची माहिती लोणीकंद पोलिसांनी मिळाल्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला असता तपास पथकाला मिळून आला. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.




















