खडकीत दुचाकीच्या डिक्कीतून लंपास
marathinews24.com
पुणे – शहरातील नवले पुलाजवळ मोबाइलवर बोलत थांबलेल्या तरुणाच्या हातातील १ लाख ४० हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरट्याने हिसकावून नेला. ही घटना २३ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास डेक्कन पॅव्हेलियन हॉटेलसमोरील टपरीजवळ घडली. याप्रकरणी अनंत शशिकांत निंबाळकर (वय २३, रा. साई वृंदावन सोसायटी, अभिरुची मॉलमागे, वडगाव खुर्द, सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
निंबाळकर हे मोबाइल हातात धरून हेडफोनवर बोलत थांबले होते. त्यावेळी चोरट्याने संधी साधून त्यांच्या हातातील महागडा मोबाइल हिसकावला आणि पळ काढला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक इसराईल शेख तपास करीत आहेत. दुसऱ्या घटनेत खडकी बाजार परिसरात दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेला २५ हजार ९९० रुपये किमतीचा मोबाइल चोरट्याने चोरून नेला. ही घटना २९ सप्टेंबर रोजी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान सय्यद डॉक्टर यांच्या दवाखान्यासमोर घडली. याप्रकरणी हेनरी नारायण रेड्डी (वय ६२, रा. सर्व्हंट क्वार्टर्स, सेंट जोसेफ स्कूलजवळ, खडकी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
रेड्डी यांनी त्यांचा मोबाइल दुचाकीच्या डिक्कीत ठेवला होता. अज्ञात चोरट्याने डिक्कीतील मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करीत आहेत.






















