Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेत

Pune Bibwewadi Robbery Case

बिबवेवाडी आणि लोणी काळभोरमध्ये कारवाई

marathinews24.com

पुणे – गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघांना अटक करण्यात आली. बिबवेवाडी, तसेच लोणी काळभोर भागात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत आरोपींकडून गावठी दारू जप्त केली. बिबवेवाडीतील गंगाधाम-मार्केट यार्ड रस्ता परिसरातील आईमाता मंदिराजवळील मोकळ्या जागेत गावठी दारू विक्री करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. नागबत्ती उर्फ नागोली सवालसिंग राठोड (वय ४५, सध्या रा. नाझ पानपट्टीमागे, गंगाधाम रस्ता) हिला अटक करण्यात आली.

पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळे – सविस्तर बातमी

पोलीस हवालदार संजीव कळंबे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नागोली राठोड गावठी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी तिच्याकडून ३७ लिटर गावठी दारू जप्त केली. या दारूत नवसागर, रासायनिक पदार्थांचा वापर केल्याचे उघडकीस आले. विषारी दारू विक्री करुन मानवी जिवितास धोका निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक साेळुंके तपास करत आहेत.

बिबवेवाडीतील गव्हाणे वस्ती परिसरात विषारी दारू विक्री केल्या प्रकरणी निकिता आदित्य राठोड (वय २१, रा. गव्हाणे वस्ती, बिबवेवाडी) हिला अटक करण्यात आली. पोलीस शिपाई प्रतीक्षा चंदनिशव यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राठोड हिच्याकडून विषारी दारू जप्त करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करत आहेत.

लोणी काळभोर परिसरात गावठी दारू विक्री केल्या प्रकरणी दुर्गेश तानाजी धायगुडे (वय २९, रा. सिद्राममळा, लोणी काळभोर) याला अटक करण्यात आली. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलीस हवालदार संतोष वणवे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक माळी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×