बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे भागात घडली. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.नरबहाद्दुर खडकबहाद्दुर साऊद (वय ४०, सध्या रा. वाराणसी सोसयायटीजवळ, वारजे माळवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत त्याची पत्नी नन्नकला (वय ४०) हिने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खासगी प्रवासी बस चालक गणपती राजकुमार गव्हाणे (वय ३३, रा. लाली बुद्रुक, जळकोट, जि. लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेत – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साऊद दाम्पत्य मूळचे नेपाळचे आहेत. नरबहाद्दुर रखवालदार म्हणून काम करायचा. तो २४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरुन निघाला होता. शोभापूरम सोसायटीसमोर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसने नरबहाद्दुर याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या नरबहाद्दुर याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक रायगोंडा तपास करत आहेत.






















