Breking News
26/11 Mumbai Attack Martyrs Tribute Pune : पुणे शहर पोलिसांसह पुणेकरांची मुंबई २६ / ११ हल्ल्यातील हुतात्म्यांना मानवंदनाPune Vigyan Nandi Sammelan : विज्ञान साहित्यात ज्ञानभाषा व लोकभाषेचा संगम व्हायला हवाBaburao Shewale Hospital : लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळेPune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळे

Pune Vigyan Nandi Sammelan : विज्ञान साहित्यात ज्ञानभाषा व लोकभाषेचा संगम व्हायला हवा

Pune Vigyan Nandi Sammelan

डाॅ. पंडित विद्यासागर यांचे प्रतिपादन; मराठी साहित्य-विज्ञानाचा संगम साधणाऱ्या विज्ञान नांदी संमेलनाचे उद्घाटन

marathinews24.com

पुणे -Pune Vigyan Nandi Sammelan : “विज्ञान साहित्याला मुख्य धारेतील साहित्य संमेलनामध्ये सातत्यपूर्ण आणि समान स्थान असावे. विज्ञान साहित्याच्या निर्मिती, जतन व संवर्धनासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवावा, तसेच दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी ज्ञानभाषा व लोकभाषेचा संगम व्हायला हवा,” असे प्रतिपादन ज्येष्ठ वैज्ञानिक, माजी कुलगुरू डाॅ. पंडित विद्यासागर यांनी केले.

लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळे – सविस्तर बातमी 

शिक्षण प्रसारक मंडळी, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र आयोजित विज्ञान नांदी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. विद्यासागर अध्यक्षपदावरून बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळींच्या परिसरातील ज्ञानमंडपम् येथील भाऊसाहेब चितळे सभागृहात आयोजित संमेलनावेळी विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष डाॅ. नितीन करमळकर, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष सुधीर काळकर, उपाध्यक्ष राधेश्याम अग्रवाल, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डाॅ. स्वाती महाळंक, विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री डाॅ. शिवकुमार शर्मा, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डाॅ. आनंद काटीकर आदी उपस्थित होते. भारतीय संविधानाला अभिवादन, महाराष्ट्र गीत गायन आणि नांदी व सरस्वती पूजनाने संमेलनाची सुरुवात झाली. उद्घाटनानंतर विज्ञानकथा अभिवाचन झाले. त्यामध्ये अभिनेते राहुल सोलापूरकर, ज्योती मालशे व मंदार कुलकर्णी यांनी विज्ञानकथांचे अभिवाचन केले.

अध्यक्षीय मनोगतात विज्ञान साहित्य निर्मितीला पोषक, प्रोत्साहक वातावरण निर्माण होण्यासाठी शासकीय तसेच अन्य पातळ्यांवर विविध योजनांची आवश्यकता आहे आणि अधिकृत संकल्पना कोशाची गरज आहे, असे सांगून डाॅ. विद्यासागर यांनी संपूर्ण शिक्षण प्रक्रियेत मातृभाषेला प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली. मराठी भाषा प्राचीन आहे, पण साहित्यनिर्मितीसाठी १३ वे शतक उजाडले. ज्ञानदेव, तुकोबांनी, एकनाथांनी ती सुरवात केली. (Pune Vigyan Nandi Sammelan) विज्ञानलेखकांनी आपल्या संतसाहित्यातून प्रेरणा घ्याव्यात, असेही त्यांनी सुचवले. विज्ञान साहित्याने कल्पकता, अद्भुताच्या आणि रंजनाच्या, माहितीच्या जोडीने माणूस केंद्रस्थानी ठेवणारे लेखन पुढे आणावे. विज्ञानविषयक साहित्य अनेकदा बोजड होऊ शकते. ते टाळण्यासाठी संतसाहित्याचा मागोवा मार्गदर्शक ठरेल कारण संतांनी सर्व लेखन लोकभाषेत केले आहे. तो वस्तुपाठ अंगिकारण्याची गरज आहे, असे विद्यासागर म्हणाले.

डॉ. विद्यासागर पुढे म्हणाले की, विज्ञान साहित्याच्या निर्मितीसाठी ज्ञानभाषा आणि लोकभाषेचा समन्वय लेखकांनी राखला पाहिजे. तरच वाचकांचे आकलन आणि समज उंचावण्याची शक्यता आहे. विज्ञान साहित्यात सातत्याने नवी भर पडणे स्वाभाविक आहे कारण नवे शोध, नवे तंत्रज्ञान विकसित होत असते. त्याचा मागोवा साहित्यात प्रतिबिंबित झाला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विवेकाने करून अनुवादांना पाठबळ दिले पाहिजे. मुख्य म्हणजे ज्या सहजतेने आपण समाज म्हणून तंत्रज्ञानाचा स्वीकार करतो, त्या सहजतेने विज्ञानाचा अंगिकार करतो का, हा प्रश्न स्वतःलाच विचारला पाहिजे. मराठी शाळा बंद पडणार असतील, तर मराठीतील विज्ञान साहित्याची नवनिर्मिती आणि नववाचक निर्मिती कशी होणार, याचा गांभीर्याने विचार हवा. नव्या शैक्षणिक धोरणात नेमका हाच मुद्दा बाजूला पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. उच्चशिक्षणातून मराठी बाजूला केल्याचे वास्तव खेदकारक आहे, असे ते म्हणाले.

डाॅ. शिवकुमार शर्मा यांनी वैज्ञानिक दृष्टीला सामाजिक आयाम देण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. भाषा हा केवळ शब्दसंग्रह नसतो. त्या त्या समाजाच्या जाणिवा, संवेदना, संस्कृतीचा तो समग्र आलेख असतो. विज्ञान भारतीने हा दृष्टीकोन स्वीकारून देशभर कार्याची उभारणी केली आहे, असे शर्मा म्हणाले.

डाॅ. महाळंक यांनी सर्जनशील विज्ञानविषयक लेखनाचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. माहिती, मनोरंजनाच्या जोडीने मूलभूत वैज्ञानिक संकल्पना, नवे शोध, नवे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्तेचे जग यांचे चित्रण विज्ञान दीर्घिका, विज्ञानविषयक ललितबंध, अशा आकृतीबंधातूनही लिहिले जावे. साहित्य परिषद त्यासाठी सहकार्य करेल, असे त्या म्हणाल्या.

सुधीर काळकर यांनी विज्ञान नांदी संमेलनाचे आयोजन हा अभिमानाचा व आनंदाचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली. विज्ञान, साहित्य आणि शिक्षणाचा संगम या निमित्ताने होत आहे, जो संस्थेच्या इनोव्हेशन, संशोधनाच्या भूमिकेला पूरक आहे, असे ते म्हणाले.

विज्ञानभारतीच्या कार्याचा आढावा घेतानाच डाॅ. नितीन करमळकर यांनी चिकित्सक दृष्टीकोनाचा विकास व्हावा आणि नव्या पिढीपर्यंत ही दृष्टी पोहोचावी, या हेतूने विज्ञान भारती कार्यरत असल्याचे सांगितले.

स्वागतपर प्रास्ताविकात डाॅ. आनंद काटीकर यांनी विज्ञानविषय़क साहित्य हा साहित्याच्या मुख्य धारेत दुर्लक्षित घटक राहिल्याची खंत मांडली. वैज्ञानिक तथ्यांवर आधारीत लेखन समाजाला, विद्यार्थ्यांना नेमकी दिशा देते, मात्र ते रंजक पद्धतीने पोहोचले पाहिजे, असे ते म्हणाले.

प्रेक्षागृहात संस्थापक सदस्य डाॅ. क. कृ. क्षीरसागर, मसापचे कार्यवाह प्रसाद मिरासदार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. शि. प्र. मंडळीच्या सचिव रमा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×